ग्रामीण शिक्षण संस्थेचा पुढाकार
संजीव बडोले/नवेगावबांध
जगभर हैदोस घालणाऱ्या व लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या covid-19 या कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे राज्यात कोरोनाव्हायरस चे संकट उभे ठाकले आहे. राज्यात नागरिक सुरक्षित रहावे. यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे.या कार्यात आपलाही सहभाग असावा, कोरोनाव्हायरस मुळे राज्य सध्या संकटात आहे, यातला काही वाटा आपणही उचलावा. या उदात्त हेतूने नवेगाव बांध येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव तथा श्रीकृष्ण अवधूत आश्रमशाळा कोकणा चे संचालक,भारतीय किसान कांग्रेस चे अर्जुनीमोर तालुका अध्यक्ष डॉ. देवाजी कापगते ,अध्यक्ष रूपलताताई कापगते यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 हजार रुपये देऊन सहाय्यता केली आहे.
ग्रामीण शिक्षण संस्था नवेगावबांध संस्थेचे सचिव डॉ. देवाजी कापगते व संस्थेचे अध्यक्ष रुपलताताई कापगते यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना जिल्हा नियोजन अधिकारी गोंदिया नखाते मॅडम यांचे मार्फत मुख्यमंत्री साहाय्य निधीत 51000 रुपये देण्यात आले.ह्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष योगेंद्र कापगते उपस्थित होते.