Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ११, २०२०

110 वाहनधारकांवर दंड; संचार बंदीत विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई



राजुरा पोलिसांची कारवाई
राजुरा/ प्रतिनिधी:
कोरोणामुळे देश टाळेबंद आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात संचार बंदी सुरू आहे.प्रशासनातर्फे कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ची संख्या वाढत असल्याने राजुरा पोलिसांनी आज दिनांक 11 एप्रिल ला सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान नाकाबंदी केली .यात मोटर वाहन कायद्याअंतर्गत 110 दुचाकी वाहन धारकांवर कारवाई केली. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसलेला आहे.

कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी देश एकवीस दिवस टाळेबंद आहे. जिल्ह्यात अंतर सीमा व राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. शहरात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. नागरिकांना रस्त्यावर विनाकारण घराबाहेर पडू नका. 

प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलेले आहे. मात्र नागरिकांची वाढत्या गर्दीवर आळा घालण्यासाठी राजुरा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव व ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 एप्रिल ला दोन तास नाकाबंदी केली .यात शेकडो वाहने विनापरवाने आढळली. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत नागरिकांवर कारवाई करून वाहने चालन करण्यात आली .काही वाहनांना जप्त करण्यात आलेले आहे. अशी माहिती ठाणेदार नरेंद्र कोसुरकर यांनी दिली.

नागरिकाने विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेसाठी फक्त नागरिकाने वाहनांचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंसाठी दिलेल्या दिलेल्या वेळापत्रकात नुसारच नागरिकांनी आदेशाचे पालन करावे. गर्दी टाळावी आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत.
- नरेंद्र कोसुरकर, पोलीस निरीक्षक .राजुरा

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.