गोरगरिब दुःखीत पीड़ित यांना केले धान्य वाटप !
येवला प्रतिनिधी: - विजय खैरनार
येवला: तालुक्यातील राजापूर येथे आज आदिवासी गोर गरिबांना सध्या कामे नसल्याने गरिबांना आपले पोट भरण्याची चिंता वाढली आहे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शेतकरी वर्ग आपल्या शेतातील कामे मजुराना कामाला न बोलवता घरच्याघरी करत असल्याने राजापूर येथील गोरगरिबांना आपले पोट कसे भरायचे या चिंतेत होते. येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड व राजापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद बोडके यांच्या वतीने आदीवासी वस्तीमध्ये दोन पोते गहू व दोन पोते बाजरीचे वाटप करण्यात आले राजापुर येथील आदीवासी वस्तीच्या नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून प्रमोद बोडके यांनी पुढाकार घेऊन या गोरगरिबांना दोन पोते गहू दोन पोते बाजरीचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मण घुगे, उपसरपंच काशिनाथ चव्हाण,अनिल अलगट, समाधान चव्हाण , राजेंद्र आव्हाड, संजय बोडके ,मारुती बोडके, शांताराम अलगट, साहेबराव वाघ, फकीरा माळी,संजय ठाकरे, दिनकर वाघ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.