Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १६, २०२०

विदर्भातून प्रदेशाध्यक्ष पदासाठी राहुल कामळे यांचे नाव चर्चेत

●रा.वि.काँ चे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भाला दया.
●विदर्भातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष पदी पूर्व विदर्भाला स्थान दयावे




राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा अजिंक्य राणा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रावीकाँचे प्रदेशाध्यक्ष पद आता विदर्भाच्या वाट्याला यावे यासाठी नागपूर विभागातील व विदर्भातील कार्यकर्त्यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वसामान्यांमधून उभे झालेले विद्यमान प्रदेश सरचिटणीस राहुल कामळे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी रेटून धरले आहे. त्यामुळे यावर्षी रावीकाँचे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भात आणि तेही नागपूर विभागात मिळाल्यास विदर्भातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या संघटन बांधणीवर त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकते.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल कामळे हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटने मध्ये वार्ड अध्यक्ष, पूर्व नागपूर अध्यक्ष, नागपूर शहर उपाध्यक्ष, नागपूर जिल्हाध्यक्ष व आता महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अश्या लहान पदा पासून ते प्रदेश मधील मोठ्या पदा पर्यंत त्यांचा संघटना वाढी करीता प्रवास त्यांनी केलेला आहे.
अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी अनेक वेळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर मोर्चे, निवेदन,तीव्र आंदोलन, त्यांनी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे, उदाहरणार्थ:- एक खिडकी योजना, इंजिनिअरिंग च्या विध्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात परीक्षा केंद्र देणे, ATKT, विद्यापीठ विद्यार्थी संघा मार्फत विद्यापीठात "युवारंग " चे आयोजन करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व आदिवासी विध्यार्थ्यांना सांस्कृतिक मंच त्यांनी उपलब्ध करून दिले, नोकरी करून शिकवणी वर्ग चालविणाऱ्या शिक्षकावरती त्यांनी फास आवळला, विद्यापीठात दरवर्षी प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या जागा वाढविणे, गडचिरोली येतील गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव श्री.डॉ.विनायक इरपाते यांना राजीनामा देण्यास भाग पाडने असे एक ना अनेके आंदोलन त्यांनी विद्यार्थी हिता करिता केलेले आहे, वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःवर पोलिस केसेस सुद्दा लाहून घेतलेल्या आहेत,
महत्वाचं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर अनेक वर्षांपासून भाजप ची सत्ता असून राहुल कामळे यांनी सलग चार दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष, सचिव पदावरती झेंडा पडकविला आहे.
तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापणे नंतर गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघावर अध्यक्ष, सचिव निवळून आणण्याचा मान सुद्दा राहुल कामळे यांनी पक्षाला मिळऊन दिलेला आहे करिता आमची सर्व विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अशी इच्छा आहे की पुढील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून राहूल भाऊ कामळे यांना संधी देण्यात यावी व विदर्भाला मोठ्या पद निवळी मध्ये स्थान द्यावे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. व प्रदेश चे नेते सुद्धा त्यांचा नावाचा विचार करतील अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
आजवर रावीकाँचे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भाच्या वाट्याला आले नसून विदर्भात राष्ट्रवादी त्यामुळे फारसा प्रभाव पडलेला नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विदर्भात नेतृत्व दिल्यास त्यांना परिणाम भविष्यातील पक्ष बांधणी तसेच मजबुतीवर होईल असे मानले जात आहे.
राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमामुळे आजवर येथील कार्यकर्ते सतत नाराज राहिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी ने रा.वि.काँ चे प्रदेशाध्यक्ष पद राहुल कामळे यांना देऊन विदर्भाला द्यावे अशी मागणी केली जात आहे..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.