चंद्रपुर:
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर युवासेना सराव परीक्षा (सीईटी व नीट) सन २०२० च्या पूर्वतयारी परीक्षेचे आयोजन २९, ३०, ३१मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
ही परीक्षा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरीय ऑफलाईन (offline) होणार होती परंतु कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक भान ठेऊन आता हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची भीती व दडपण असल्यामुळे हि परीक्षा देणे बहुतांशी विद्यार्थी टाळाटाळ करीत असतात. परंतु या परीक्षेबाबत मुलांमधील भीती व मनावर असलेले दडपण पूर्णपणे दूर व्हावे व मोठ्या संख्येने हि परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यावी, या उद्देशाने युवासेनेने एक उचललेले पाऊल असून युवासेनेच्या माध्यमातून यावर्षी मॉक टेस्ट परीक्षा २९, ३०, ३१ मार्च या तारखा संपूर्ण महाराष्ट्र भरात आयोजित केल्याने ज्या विध्यार्थांना या परिक्षेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी WWW.YUVASENACET.COM या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन परिक्षेचा फाॅर्म भरुन घ्यावा. तसेच अधिक माहिती करीता प्रत्येक तालुक्यातील युवासेना पदाधीकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्यावी.
सदर परीक्षा घरी बसून विद्यार्थ्यांना देता येणार असून त्या करिता रेजिस्ट्रेशन नंतर विद्यार्थ्यांना login id आणि password, SMS व्दारे त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर देण्यात येणार आहे. करीता आपल्या चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या सुवर्णसंधीचा लाभ घावा असे, आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश र. बेलखेडे यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.
अधिक माहिती करिता 8805007700, 9673977576, 7507350754, 985046781, 9960595777 या क्रमांकावर वर संपर्क साधू शकता.