रॉबिनहूड हितेशने केले विश्वासला भावाच्या स्वाधीन
गळाभेट घेतांना मोठया भावाला झाले अश्रू अनावर
खापरखेडा-प्रतिनिधी
(सुनील जालंदर)
जन्म देणाऱ्या आईच्या मायेची किंमत जगात कुठेही नाही असे म्हणतात अशीच कहाणी आहे ऐका पदवीधर तरुणांची....
एक पदवीधर आपल्या आईवर जिवापाड प्रेम करायचा एक दिवस त्या तरुणांच्या आईचे अचानक निधन झाले त्यामुळे तो कायमचा तणावात गेला गल्लो गल्लीत भटकत राहिला एक दिवस त्याने घर सोडले या घटनेला एका वर्षाचा कालावधी झाला मनोरुग्णांचा रॉबिनहूड नावाने प्रसिद्ध असलेला हितेश बन्सोडला सोशल मिडियावरच्या मित्रांनी मेटपांजरा काटोल रस्त्याच्या जंगलात एक मनोरुग्ण असल्याची दिली रॉबिनहूड हितेशने मेटपांजरा जंगलातून त्या मनोरुग्ण तरुणाला ताब्यात घेतले सोशल मिडीयावरून ओळख पाठविण्याचे आव्हान केले अखेर तिन दिवसानंतर रॉबिनहूड हितेशच्या प्रयत्नांना यश आले 23 फेब्रुवारी रविवारला नाशिक वरून सावनेरला आलेल्या पदवीधर मनोरुग्ण तरुणाला त्याच्या मोठया भावाच्या स्वाधीन केले.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा आहे पदवीधर असलेला विश्वास विठ्ठल गवई मुळगाव बोरगाव मंजू जिल्हा आकोला येथील तरुणाची....
बोरगाव मंजू येथेे विश्वासचे वडील विठ्ठल गवई यांची दोन एकर शेती असून पत्नी शिला मोठा मुलगा राजेंद्र, सून आणि लहान मुलगा विश्वास असे छोटेसे कुटुंब आहे.
विश्वास विठ्ठल गवई वय 28 रा बोरगाव मंजू जिल्हा आकोला हा लहानपणापासून शिक्षणात फार हुशार होता त्याची शिक्षणात आवड बघून वडिलांनी घरात अठरा विश्वे दारिद्र असतांना त्याला पदवी पर्यंत शिकविले यादरम्यान त्याची आई शिलाचे निधन झाले आईच्या निधनामुळे विश्वासच्या अंगावर पहाड कोसळले त्यामुळे तो नेहमी तणावात राहू लागला गावात इकडे तिकडे भटकू लागला एके दिवशी तो घरून निघून गेला घरच्यांनी त्याला शोधण्याचा बराच प्रयत्न केला मात्र विश्वास कुठेही आढळून आला नाही यादरम्यान मुलगा परत येण्याची वाट बघत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाला आई वडिलांचे निधन झाले शिवाय लहान भाऊ विश्वास घरून निघून गेला त्यामुळे मोठया भावाने आपल्या कुटूंबासह नाशिक गाठले आणि ते तेथेच स्थाईक झालेत.
फेसबुकच्या मित्राला आढळून आला मनोरुग्ण विश्वास
विश्वास मागील एका वर्षापासून मनोरुग्णां सारखा भटकत होता मागील दोन महिन्यांपासून मेटपांजरा काटोल रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात मनोरुग्ण असल्याची माहिती 20 फेब्रुवारीला सिकंदर सोलंकी रा चिखली ता काटोल या तरुणाने मनोरुग्णां साठी प्रसिद्ध असलेल्या रॉबिनहूड हितेश बन्सोड दिली शिवाय एका कागदावर दिवसभर काहीतरी लिहीत असल्याचे सांगून वडील सांभाळ करीत असल्याचे सांगितले
रॉबिनहूड हितेशने सोशल मिडियाच्या माध्यमातून घेतला शोध
विश्वास मनोरुग्ण असल्याची खात्री पटल्यावर मेटपांजरा गाठून विश्वासला रॉबिनहूड हितेशने ताब्यात घेतले सोशल मिडियां मित्रांच्या मदतीने सावनेर येथील आपल्या घरी आणले यावेळी मनोरुग्ण विश्वासची कटिंग दाढी करून त्याला आंघोळ करून दिली नवीन कपडे घातले यावेळी विश्वासकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला फक्त गावाचे नाव माहित होते याचा आधार घेऊन रॉबिनहूड हितेशने एक व्हिडिओ तयार केला सोशल मिडियावर अपलोड करून विश्वासची ओळख पटवून देण्याचे आव्हान केले अखेर या शोध मोहिमेला यश आले.
एका वर्षानंतर दोन भावांची गळा भेट
सोशल मिडीयावर विश्वास व्हिडिओ व्हायलर करण्यात आला विश्वास राहत असलेल्या गावातून जवळपास 300 कॉल आले विश्वास सुखरूप असल्याची माहिती मोठा भाऊ राजेंद्र गवई यांना देण्यात आली 23 फेब्रुवारी रविवारला राजेंद्र व त्यांच्या पत्नी अलविना यांनी सावनेर येथे रॉबिनहूड हितेश बन्सोड यांचे घर गाठले तब्बल एका वर्षानंतर दोन्ही भावांची गळाभेट झाली यावेळी वातावरण भावूक झाले होते याप्रसंगी उपस्थित असलेल्या सोशल मिडिया वरच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते शोधमोहिमेत हिमांशू बटोले, नीरज मोरे, ऋतुजा काकडे, ज्योति हितेश बनसोड, टीना सिंग मनीष राऊत,मिलिंद विश्कर्मा,प्रथमेश पानसे,आणि सर्व फेसबुक मित्रांनी सहकार्य केले.
मनोरुग्णांचा रॉबिनहूड या नावाने सावनेर येथील हितेश बन्सोड संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहेत दिन दलितांची सेवा म्हणजे खरी ईश्वर सेवा असे म्हणणे हितेश बन्सोड यांचे आहे मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी कुणाला आधार द्या असे रॉबिनहूड हितेश आवर्जून सांगतो गाडगेबाबांच्या जयंतीच्या दिवशी एका वर्षांपासून विभक्त झालेल्या दोन भावांची गळाभेट झाली आज खऱ्या अर्थाने मी गाडगेबाबा जयंती साजरी केल्याचे पुण्य नगरीला सांगितले.