सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका येथील मनोहर फत्तुजी गेडाम आणि श्यामलता मनोहर गेडाम या शेतकरी-शेतमजूर दाम्पत्याचा लहान मुलगा स्वप्नील मनोहर गेडाम यांची पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) पदी निवड झाली.
स्वप्नील मनोहर गेडाम यांचे प्राथमिक शिक्षण सावली येथील जि.प.प्राथमिक शाळा सावली येथे तर माध्यमिक शिक्षण रमाबाई आंबेडकर विद्यालय इथे झाले आहे.
सावलीतील या शेतकरी कुटुंबाला तीन मुले आणि एक मुलगी परिस्थिती एकदम हलाखीची अशातच चारही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी एक आईने उचलून वेळोवळी आपल्या परिस्थिती ची जाणीव करुन शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होती.अशातच स्वप्नील मनोहर गेडाम यांची नुकताच निकाल लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC ) माध्यमातून घेण्यात आलेल्या सन २०१८-१९ परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून १७ रँकिंगमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
स्वप्नील गेडाम यांनी सावली येथील रमाबाई आंबेडकर महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण पुर्ण केले आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवत मुरखळा ( गडचिरोली ) येथे साईनाथ अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेऊन डि.एड. पुर्ण केले. पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता चंद्रपूरला जाऊन एका नामवंत खाजगी दवाखान्यात काम करुन परिक्षेची तयारी करत होते. अशातच त्या वर्षात वनविभाग चंद्रपूर कडून वनरक्षकाच्या जागा निघाल्या त्यात त्यांनी अभ्यास करुन वनरक्षक पदी निवड झाली. पुढे त्यांनी वनविभागात वनरक्षाकाची नौकरी आणी आपल्या पुढील शिक्षणाचा अभ्यास सुरु ठेवून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र मुक्तविद्यापिठातून पुर्ण केले. अशातच त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली त्यात मेन परिक्षेत ४ गुणाने अपात्र व्हावे लागले.तरी न डगमगता अत्यंत जिद्दीने कठोर परिश्रम घेत परत पुढील अभ्यासाकडे लक्ष देत आपल्या झालेल्या चूका सुधारत आई-वडील , भाऊ -बहिण यांच्या विश्वासाला सार्थ ठरवित २०१८-१९ ला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक परीक्षा देऊन त्यात त्यांची निवड झाली. अशातऱ्हेने आपले आणि परिवाराचे स्वप्न साकार केले.
या यशाबद्दल त्यांनी रमाबाई आंबेडकर महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक वर्ग , गावातील नागरिक ,मित्र परिवार ,नातेवाईक ,आणि आईबाबा , बहिणभाऊ आणि कार्यरत असलेल्या वनविभागातील कर्मचाऱ्यांना दिले आहे. करिता गावातील नागरिकांकडून आणि परिवारांकडून स्वप्नील गेडाम चे सर्वत्र कौतुक होत आहे.