राजुरा/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचललेली आहेत. 31 मार्च पर्यंत जिल्ह्यात संचार बंदी व आंतरजिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा व महाराष्ट्र राज्याची सीमा सील करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे,अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर सक्तीने कारवाई करण्यात येईल.असा इशारा पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांनी दिलेला आहे.
कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. लोकांनी कोरोणा विषाणूंचा संसर्ग थांबविण्यासाठी घराबाहेर पडू नये. आंतरजिल्हा बंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आलेले आहेत. परवानगीशिवाय बाहेर जिल्ह्यात जाण्यास सक्त मनाई आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 11.00 ते 5.00 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. त्यामुळे संचार बंदीच्या काळात नागरिकांनी अनावश्यक बाहेर फिरू नये .नियमाचे उल्लंघन करणार्याविरुद्ध सक्तीने कारवाई केली जाईल. स्वतःच्या व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन राजुरा पोलिसांनी केले आहे.