कोरोना रोखण्यासाठी केली गावात जनजागृती
नागपूर: अरुण कराळे:
नागपूर तालुक्यातील दवलामेटी ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रविवार २९ मार्च पासून संपूर्ण परिसरात सोडीयम हायड्रोक्लोराइड युक्त औषधीची फवारणी केली जात आहे सोबतच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनजागृती सुरु असल्याची माहिती ग्रामविकास आधिकारी विष्णू पोटभरे यांनी दिली. गावातील मुख्य रस्त्यावर,किराणा दुकान तसेच गर्दी जमलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायड्रोक्लोराइड ची फवारणी करण्यात आली.
दवलामेटी ग्राम पंचायत कोरोनाचा पराभव करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे याचाच भाग म्हणुन काल रात्री जंतुनाशक पावडर टाकण्यात आले . रविवार सकाळी सरपंच आंनदाताई कपनीचोर यांनी दुसरी खबरदारी म्हणुन स्वःता उभ्या राहुन जंतुनाशकाची संपुर्ण गावभर कानाकोपरा फवारणी केली .
उपसरपंच गजानन रामेकर हे गावातील सर्व नागरीकांची काळजी घेत आहेत प्रत्येकाला घराबाहेर फिरू नका असा संदेश देत आहेत. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची माहिती शासनाने दिलेल्या वेबसाईटवर ग्रामपंचायत वेळोवेळी पाठवीत आहे व त्यांना घरातच थांबविण्याचे निर्देश देण्यात देत आहे. कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे, सरपंच आनंदाताई कपनीचोर,उपसरपंच गजानन रामेकर,माजी सरपंच संजय कपनीचोर, ग्रा.पं.सदस्य नितीन अडसड ,प्रशांत केवटे, रमेश गोमासे, सुनिल महाजन, विशाल कूंभरे, मयूर मानकर तसेच संपूर्ण ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रयत्नरत आहे.