न. प. प्रशासनाने कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपायासाठी कसली कंबर
नागपूर : अरूण कराळे:
नागरिकांचे कोरोना विषाणू रोगाशी लढण्यासाठी पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने वाडी नगरपरिषद प्रशासनाने कठोर पाऊले उचलत शासकीय नियमाचे व निर्बंधाचे पालन न करणाऱ्या अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या किराणा,भाजीपाला,औषधी दुकानदार,पेट्रोल पंप,ग्राहकांकर कडक कार्यवाही करण्याचे तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारी व कर्तव्य यात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार त्याचप्रमाणे नागरिक नियमाचे व स्थानिक प्रशासनाने सूचनांचे पालन न केल्यास आढळल्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनतर्फे कठोर पाऊले उचलत संबंधितांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिला आहे.
कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून शासनाच्या नियमाचे पालन करीत नागरिकांनी सुरक्षित जीवन जगत दुसऱ्यानाही सहकार्य करण्याचे आवहान मुख्याधिकारी यांनी केले आहे.अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या दुकानदारांनी,मांस विक्रेते,पेट्रोल पंप शासनाचे आदेशाचे पालन करीत विक्री करताना ग्राहकांची गर्दी होणार
याची दक्षता घेत सॅनिटायझर,हात धुण्यासाठी पाण्याची बकेट,एक मीटरवर रेखांकन पध्द्तीचा वापर केला की नाही तसेच दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्या जात आहे का याची पाहणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने भरारी पथक तयार केले आहे . शहरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असून शासकीय नियमाचे तसेच घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होत असल्यास तसेच संचारबंदी काळात अवैध दारू,किराणा बाजारात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करीत पोलीसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल.या मोहिमेत ज्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडे सोपविलेल्या जबाबदारी संदर्भात हलगर्जीपणा होत असल्याचे आढळल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्याधिकारी यांनी केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणीला सुरुवात झाली असून स्वतःमुख्याधिकारी हजर राहून पाहणी करीत आहे.शहरात ऑटो फिरवून लोकांमधून कोरोनाची घबराट दूर व्हावी यासाठी विस्तृत माहिती देत जनजागृती केल्या जात असतांना मात्र विदयमान नगरसेवक आपल्याला काहीही घेणे देणे नसल्यासारखे सुस्त घरात बसून आहे.निवडणूकीत निवडून येण्यासाठी वारेमाप पैसे उधडणारे आजच्या कठीण घडीला आपल्या वॉर्डात काय सुरू आहे,मतदारांना कशाची गरज आहे याची साधी माहिती घेण्याला विचारपूस करायला लोकप्रतिनिधीला उसंत मिळत नाही.
त्याबद्धल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे तर दुसरीकडे कोरोनाचा पराभव करण्यासाठी वाडी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून अहोरात्र मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कामात स्वतःला जुंपुन घेतलेआहे.त्यासाठी समस्त नागरीकांनी स्वतःची काळजी घेत घराबाहेर फिरू नये,काम नसताना जागरूक नागरिकांनी बसस्टॅन्ड,चौकात,अत्यावश्यक दुकान तसेच मंदिरा समोर बसु नका,बाहेर फिरू नका सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशा भावनिक आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.