पिपळा ग्राम पंचायतच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
नागपूर : अरूण कराळे :
सध्या संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार माजला आहे. सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केल्यामुळे गोर-गरीबांना आपल्या दोन टाईप च्या जेवनाचे वांदे आले आहेत त्यामुळे पिपळा ( घोगली) येथे शिवछत्रपती युवा बहुउद्देशिय संस्था,पिपळाचे संचालक तथा पिपळाचे सरपंच नरेश भोयर यांच्या तर्फे मध्य प्रदेश,शिवणी,बालाघाट येथुन आलेल्या मजुरांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यामुळे अत्यंत गरीब व म्हातारे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या उपक्रमामुळे माणुसकीचे दर्शन झाले असून या नाविन्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गट ग्राम पंचायत पिपळा घोगली परिसरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते कि कोरोना विषाणूच्या लागणमुळे आपल्या जिल्हयातील हॉस्पिटल मधील रक्त साठा कमी होत आहे भविष्यात पुन्हा रक्ताची मोठया प्रमाणात गरज भासणार असून अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून बहुसंख्य नागरीकांनी रक्त दान करावे .
पिपळा ग्राम पंचायत च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे घराच्या बाहेर निघायची गरज नाही आपण जिथे राहत असेल तिथे रक्त पेढी ची गाडी घेऊन आम्ही येऊ अशा व्यक्तीने आपले नाव ,मोबाईल नंबर,घराचा पत्ता, मंगळवार ३१ मार्च पर्यंत आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर मॅसेज करून किंवा फ़ोन करुन दयावे .चला तर मग रक्त दान करुन कुणाला तरी जीवदान देऊ ९८६००६२४५० या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सरपंच नरेश भोयर यांनी केले आहे.