चंद्रपूर/प्रतिनिधी:
जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे. या विषाणूपासून बचावासाठी स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. परंतु मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे ऐकून १ कोटी निधी देऊन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधीकारी यांना दिल्या आहे.
खासदार बाळू धानोरकर यांचे खासदार स्थानिक विकास निधीतून कोरोना विषाणू विरुद्ध प्रखर लढ्यासाठी व प्रतिबंधक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी कारण्याकररिता ५० लक्ष निधी मंजूर केला आहे. तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार यांनी देखील आपल्या आमदार निधीतून रु. ५० लक्ष इतका निधी कोरोना प्रतिबंधक उपायोजना कार्याकरिता साहित्य खरेदी करण्या करीत मंजूर केला आहे.
या बाबतचे खासदार व आमदार महोदयांनी दि. २८ - ३-२०२० ला मा. जिल्हाधीकारी याना दिले आहे. खा. बाळू धानोरकर यांचे ५० लक्ष रुपये निधी पैकी २० लक्ष निधी यवतमाळ जिल्ह्याला देण्यात आला आहे. समाज व राष्ट्राप्रती समर्पित भावनेने केलेल्या कृतीबद्दल चांदपूर - यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमेटी कडून या पती पत्नीचा कार्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.