खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत एक महागडी अशी अत्याधुनिक रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्हा कारागृहा करिता मंजूर केली आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी खासदार बाळू धानोरकर यांना रुग्णवाहिकेची मागणी केली होती. खासदार बाळू धानोरकर यांनी हि मागणी मान्य करीत १२ लक्ष रुपयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याचे मान्य केले. काही दिवसातच हि रुग्णवाहिका जिल्हा कारागृहाच्या सेवेत राहणार आहे.
जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत . त्यांची प्रकृती अनेकदा बिघडत असते. परंतु जिल्हा कारागृकाकडे स्वतःची रुग्णवाहिका नसल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेकदा कैद्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यांना वेळेवर रुग्णालयात नेने अवघड होत असते. त्यामुळे जिल्हा कारागृहाकडे स्वतंत्र रुग्णवाहिका मिळण्याकरिता जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर कर्तव्यदक्ष खासदार यांनी तात्काळ खासदार निधीतून १२ लक्ष निधीतून एक रुग्णवाहिका देण्याचे त्यांनी सांगितले.
अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम रुग्णवाहिकेमुळे होत असते. रुग्णवाहिकेची सेवा ज्या रुग्णाला मिळेल तो निश्चितपणे सुरक्षित रुग्णालयात पोहोचावा व बरा होऊन स्वत:च्या पायावर चालत रुग्णालयातुन बाहेर पडावा अशी आशा खासदार बाळू धानोरकर यांनी व्येक्त केली. काही दिवसातच हि रुग्णवाहिका जिल्हा कारागृहाच्या सेवेत येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.