Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २०, २०२०

पक्षाला व आमच्या वयक्तिक प्रतिष्ठेला ठेस पोहचवून बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव:मनसे

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रविवारी १५ मार्च रोजी दत्तात्रय कंचर्लावार आणि गजानन नीलावार यांनी मनसेच्या या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वडगाव परिसरातील सोनवणे यांचे घर जेसीबीने जमीनदोस्त करत सोनवणे कुटुंबीयांना धमकावणे, जिवे मारण्याची धमकी देण्याचे आरोप करण्यात आले होते,या बाबद उत्तम चंदू सोनवणे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत माहिती दिली होती.

यानंतर यांचेवर भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४४८, ४२७, ५०६ अन्वये मनसे कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.  मात्र मनसेने शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत हे सर्व आरोप फेटाळले, हे आरोप राजकीय सुळबुद्धीने केले जात असून आमच्या मनसे पक्षाला व आमच्या वयक्तिक प्रतिष्ठेला ठेस पोहचवून बदनाम करण्याचे काम विरोधक रचत आहे असे सांगितले.आमच्या हातात कुठलेच शस्त्र व पक्षाचा झेंडा तिथे घेऊन  तिथे गेलो नाही असे मनसे कडून स्पष्ट करण्यात आले. 

मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांवरआरोप प्रत्यारोप सुरु होते,त्यावर उत्तर देतांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.आम्ही धमकावायला गेलो नव्हतो तर चिघळलेला वाद सामंजस्याने सोडवायला गेलो होते,असे मनसे पदाधिकारी पत्रपरिषदेत बोलत होते. 

सदर जागा ही ६ बांधकाम व्यावसायिकांची रजिस्ट्री केलेली मालकीची मालमत्ता आहे,व त्या प्लॉटच्या रस्त्यावरच काही लोकांनी झोपडी बांधून वास्तव्य केले,त्यांना सांगण्यात आलं होते की जेव्हा तुम्हाला जागा खाली करायला सांगणार तेव्हा खाली करून घ्या, तोपर्यंत कच्चे घरातच रहा,परंतु एका महिलेने कोणतीही प्रकारची परवानगी न घेता दुसऱ्याच्या जागेवर जबरीने आपले पक्के घर बांधले,जेव्हा ही गोष्ट या व्यावसायिकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांनी त्या जागेवर कब्जा जमवला, आणि पुढील बांधकाम सुरूच ठेवला.

  या व्यावसायिकांचा या लोकांसोबत वाद सुरू होता तेव्हा आम्ही तिथून जातांना आम्ही विचारलं असता पूर्ण प्रकरण आम्हाला सांगण्यात आले.आम्ही तिथे मध्यस्ती करून त्यांच्या सोबत बोलून त्यांना बिल्डरकडून मोबदला देऊन जागा आपल्या ताब्यात घेऊ असे कबुल झाले त्यांनुसार देयरक्कम देखील ठरली, ठरलेल्या रकमेवर सोनावणे यांनी पैसे देखील घेतले व कब्जा सोडण्यासाठी होकार दिला ,जागा खाली करून त्यानुसार ते बांधकाम काढून टाकण्यात आले व दुसऱ्या दिवशी स्टॅम्पपेपर आणि समझौता झाल्याप्रमाणे पैशे घेऊन जागेवर त्यां महिलेनी अंगठा लावला व इतर व्यक्तीने साक्षदार म्हणुन स्वाक्षरी केल्या व त्यांना पैशे दिले. 

त्यानंतर 18 तारखेला काही राजकीय पक्षाचे लोक यांना घेऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यात लावली व आमच्या बद्दल खोटी माहिती देऊन आम्हाला व त्या व्यावसायिकांना फसविण्याचा प्रकार केला.

यापूर्ण प्रकरणात आमच्या पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न  विरोधक करत आहे.तसेच बाबासाहेबांचं उल्लेख करून त्यांनी खालच्या दर्जाची राजनीतीचा वापर या प्रकरणात करण्यात येत आहे. आम्ही पक्षाचे नाव बदनाम होऊ देणार नाही अन्यथा आम्ही देखील यांच्यावर कायदेशीर कारवाही करू.असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून आयोजित पत्रपरिषदेत सांगण्यात आले.  

तर दुसरीकडे सोनावणे नामक महिलेचे घर पाडणारे बिल्डर लॉबी व मनसे पदाधिकारी वर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.