जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांनाच मिळणार पेट्रोल व डिझेल
जिल्हा प्रशासनाचा आदेश
चंद्रपूर:
जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. परंतु, या सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत.
या वाहनधारकांना मिळणार पेट्रोल
व डिझेल
किराणामाल, भाजीपाला, फळे, दुध-अंडी, औषधे पुरविण्याकरीता
वाहतुकीच्या रिकाम्या, भरलेल्या गाड्या,दुकानदार, दुकानात काम करणारे कामगार, मदतनिस यांची वाहने यांना
पेट्रोल-डिझेल मिळणार आहे.
वैद्यकीय सेवा देणारे सरकारी, खाजगी डॉक्टर,
नर्स, सिस्टर, इतर सर्व कर्मचारी,
त्यांना वाहन चालविता येत नसल्यास त्यांना सोडण्यास व घेण्यास येणा-या
व्यक्तीची वाहने, सफाई कर्मचारीमध्ये सर्व प्रकारचे हॉस्पीटल्स,
कार्यालये, नगरपालिका, जिल्हा
परिषद व इतर यांची वाहने, बँक कर्मचारी मध्ये सर्व बँका, पतपेढया इत्यादी कर्मचा-यांची
वाहने यांना पेट्रोल-डिझेल मिळणार आहे.
खाजगी व सरकारी दोन्ही (सिक्युरीटी
गार्ड) सुरक्षा कर्मचारी यांची वाहने, विजवितरणाशी संबंधीत असलेल्या सर्व कर्मचारी
व इतर यांची वाहने, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा
विभागातील सर्व कर्मचारी, कामगार व इतर यांची वाहने, साखर कारखान्यावर काम करणारे कर्मचारी, मालक,
सुपरवाईझर इत्यादी वाहनांना पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मुभा असणार आहे.
शेतमालक, शेतमजुर,
शेती कामाशी संबंधी व्यक्तीची वाहने,पत्रकार व
त्यांचे फोटोग्राफर यांची वाहने यांना देखील पेट्रोल व डिझेल भरता येणार आहे.
औषधे बनविणा-या कंपन्या, खाद्य पदार्थ
बनविणा-या कंपन्या, स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी बनविणा-या कंपन्या
या सर्व ठिकाणी काम करणारे लोक, मॅनेजर, कामगार, कच्चा माल पुरविणारे सुरक्षा रक्षक यांची वाहने
तसेच बंद करण्यात आलेल्या इतर कंपन्यांच्या
सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले सुरक्षा रक्षक यांची वाहने यांना पेट्रोल व डिझेल
पेट्रोल पंपावर भरता येणार आहे.
इंटरनेट सुविधांशी संबंधीत
कर्मचा-यांची वाहने, केबल ऑपरेटर्स यांची वाहने, टेलीफोन संबंधीत
कर्मचारी यांची वाहने, अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिवरी करणारे
कर्मचा-यांची वाहने तसेच तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी जाणारे लोक व त्यांचे वाहन, गर्भवती महिला, डायलिसिस रुग्ण, सिरियस रुग्ण, ऑपरेशनसाठी न्यावयाचे रुग्ण यांची वाहने
व सर्व रुग्णवाहिका व शववाहिका त्याचप्रमाणे
शासकीय गोदाम, वखार महामंडळ पडोली येथे अन्नधान्याची वाहतुकीकरिता
वापरण्यात येणारे ट्रक, वाहने व काम करणारे सर्व कर्मचारी व कामगार,
हमाल यांची वाहने यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरता येणार आहे.
पेट्रोल पंप धारकांनी वरील
नमूद सर्व वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलचे वितरण करावे.परंतु, संचार बंदीच्या
काळात पेट्रोल पंपवर एका वेळेस 2 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधित पेट्रोलपंप धारक व ग्राहक यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई
करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निर्देश दिले आहे.