चंद्रपूर/
देशात 144 कलम लागू होताच अत्यावश्यक सेवा, व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. मात्र नागरिकांच्या गरजा लक्षात घेता मासविक्री केंद्रासह इतर काही महत्वाच्या सेवा सुरू करण्यात याव्यात हा विषय जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्यासह झालेल्या चर्चेत आ. किशोर जोरगेवार यांनी मांडला होता. याची दखल घेत नियमानुसार मासविक्री करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
संपूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. चंद्रपूरकरांनी बंद दरम्यान प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आ. किशोर जोरगेवार यांच्या कडून वारंवार केल्या जात आहे. दरम्यान नागरिकांची अडचण लक्षात घेता मासविक्री सह इतर महत्वाच्या सेवा सुरू करण्यात याव्हात अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात होती.
आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान हा विषय मांडला याची दखल घेत उद्या पासून मास विक्रीसह इतर महत्वाच्या सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मास विक्री केंद्रावर नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे ही सांगण्यात आले असून ठरवून दिलेल्या वेळेतच मासविक्री करता येणार आहे. त्यातही ग्राहकांना तीन मिटर दूर आखण्यात आलेल्या डब्यात उभे राहून मास खरेदी करावी लागणार आहे.