Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २५, २०२०

वाडीत मुक्कामाला असलेल्या ट्रकचालकांची तपासणी करा

नगराध्यक्ष प्रेम झाडे वाडी न.प. चे वाडी पोलिस निरीक्षकांना  निवेदन
नगराध्यक्ष व नगरसेवक करणार जनजागृती

नागपूर: अरूण कराळे 
वाडी नगर परिषद क्षेत्रात मोठय़ा संख्येने ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या माध्यमातून बाहेरील राज्यातून ट्रक चालक आलेले आहे . तसेच ट्रक चालक गोडाऊनमध्ये सामुग्रीचे वहन करीत आहे .

 यासह काही वेळ निवासही करतात अशा सर्व ट्रकचालकांसोबत बाहेर राज्यातून येणार्‍या प्रवाशांची कोरोनाच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी सोमवार २३ मार्च रोजी सायंकाळी नगराध्यक्ष प्रेम झाडे , उपनगराध्यक्ष राजेश थोराने ,नगरसेवक राजेश जयस्वाल ,केशव बांदरे ,नरेंद्र मेंढे यांनी .

दिवसेंदिवस राज्यात कोरोना विषाणू आजाराच्या वाढती संख्या पाहता  या विषाणूचा नायनाट करण्यासाठी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी कंबर कसली असून नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी २५ वॉर्डातील संबंधित नगरसेवकांना सोबत घेऊन स्थानिकांनी या विषाणूला घाबरून न जाता त्यासाठी काय दक्षता घ्यावी यासाठी जनजागृती करण्याला सुरुवात केली आहे.

तर ज्या नागरीकांनी गेल्या १५  दिवसात विदेश प्रवास केला आहे अथवा कोरोनाग्रस्त शहरातून प्रवास केला आहे अशा व्यक्तींनी नगर परिषदेने जाहीर केलेल्या लिंकवर आपली माहिती देण्याचे आवाहन केले असून  वाडी न . प. तर्फे साथरोग कायदा अंतर्गत शिघ्र प्रतिसाद पथक तयार केले आहे. या पथकामार्फत वाडी शहरातील सार्वजनीक स्थळावर निर्जंतुकीकरण फवारणी  करण्याचे कार्य सुरू असल्याची माहीती मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली आहे. 

 जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी ठेवण्याची निर्धारित वेळ ठरविणे,ग्राहकांनी पाच फुटाच्या रांगेत उभे राहून सामान विकत घेणे,शहरातील पेट्रोल पंप सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजता पर्यंत या  वेळेत सुरू ठेवावे,पेट्रोल पंप सुरू असताना सॅनिटायझर फवारणी करणे,दुकानात काम करणाऱ्या कामगारांना माक्स उपलब्ध करून देणे,पोलिसांनी गस्त वाहनाच्या फेऱ्यात वाढ करून गल्लोगलीत फिरून शासनाने दिलेल्या सूचना अनाऊन्स करणे,इतर जिल्ह्यातून कुणीही नागपूर जिल्ह्यात शिरकाव करणार नाही यासाठी मुख्य रस्त्यावर तपासणी पथक नेमणे,आदींचा समावेश असून स्थानिक प्रशासनाने दवंडी द्वारे जनजागृती करणे,अजूनही शहरात दुप्पट दराने दारू विकल्या जात असल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी सक्तीचे पाऊल उचलुन अनेक रिकामटेकडे उपद्रवी मंडळी रस्त्यावर चौका- चौकात घोळक्याने बसणार नाही काम नसतांना दुचाकी,कारमध्ये फेरफटका मारणे आदी घटना घडणार नाही यासाठी कडक निर्बंध पोलिसांनी करावे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.