चंद्रपूर/प्रतिनिधी:
महायुती सरकारचा महाराष्ट्रात 100 युनिट विज मोफत देण्याचा विचार सुरू आहे. तो अभिनंदनीय असून त्या निर्णयाचा मी स्वागत करतो. परंतु चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या 30% विजेची गरज चंद्रपूर जिल्हा पूर्ण करतो. इतकेच नव्हे तर माझ्या मतदार संघात जी विज निर्माण होते ती थर्मल एनर्जी पासून तयार केल्या जाते त्यामुळे आमचा जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो.
त्याचा मोबदला म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला घरगुती वापराची 200 युनिट विज ही मोफत द्यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली. मागील अनेक दिवसांपासून जोरगेवार यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून २०० युनिट संदर्भात प्रश्न केला जात होता.त्याचीच मागणी गुरवारी जोरगेवार यांनी विधानसभेत केली.