संग्रहित |
कोरोना चाचणी निगेटिव्ह
नागपूर/ ललित लांजेवार:
सोमवारी नागपुरच्या मेयो रुग्णालयात चंद्रपूरच्या एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.मंगळवारी त्याचा अहवाल येताच त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. डॉक्टराच्या सांगण्यानुसार रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. त्याचे सिटीस्कॅन केले असता न्युमोनिया असल्याचे दिसून आले.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व न्युमोनिया रुग्णांची चाचणी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार या रुग्णाच्या चाचणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेयोला आणले. परंतु दोन तासातच त्याचा मृत्यू झाला.
सोमवारी त्याला मेयोमध्ये दाखल करण्यात आले होते. मेयोत येताच त्याचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. तत्काळ या रुग्णाचे नमुने सोमवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते मात्र ते मंगळवारी सकाळच्या सुमारास याचा रिपोर्ट हाती लागला.त्यात त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असून त्याचा मृत्यू कोरोनाने झाला नसून निमोनियाने झाला असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हा व्यक्ती चंद्रपुर चा असून गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.
सध्या नागपुरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या १६ झाली आहे.