Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १९, २०२०

अवकाळी पावसामुळे चांप्यात घर कोसळले


आदिवासी कुटुंबीय सुदैवाने बचावले 

प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून वंचित 

(अनिल पवार )चांपा:

चांपा येथे एकीकडे सर्वत्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे . आठवडाभरापासून नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामीण भागातही त्यांचे परिणाम जाणवले ,

तीन दिवसांपासून चांपा परिसरात ढगाळ वातावरण सोबतच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने चांपा परिसरात गुरुवारी, १९ रोजी सकाळी ७:४५वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडल्याने चांपा येथील रहिवासी यमुनाबाई इरपाते सहित पाच आदिवासी कुटुंबीय घरात असताना घराची छत पडल्याने प्रसंगावधान राखून आदिवासी कुटुंबातील ७०वर्षीय यमुनाबाई इरपाते व मुलगा कृष्णा इरपाते वय ३०, सून शिल्पा इरपाते , नात शिवन्या कृष्णा इरपाते वय ४, शिवंश कृष्णा इरपाते वय ३महिने हे ५ ही सदस्य वादळीवार्यासह अचानक विजाच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच यमुनाबाई यांचे कच्चे कवेलूचे घर अचानक कोसळल्याने सुदैवाने या दुर्घटनेत पांच सदस्य वेळेतच घराबाहेर पडल्याने सर्व आदिवासी कुटुंबीयाचे जीव थोडक्यातच बचावले व मोठी जीवितहानी टळली.

मात्र डोक्यावर छतच नसल्याने पंतप्रधान आवास योजनेतून पक्क्या घराची मागणी सतत करीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना अनेक वर्षापासून घरकुलाची प्रतिक्षा करावी लागत आहेत .सरपंच अतिश पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यमुनाबाई इरपाते यांना घरकुल मंजूरीचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर केला . पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी यमुनाबाई इरपाते यांच्या अधिकृत जागेच्या छायाचित्रासह जिओ ट्ग केला .मात्र अजूनपर्यंत घरकुल मंजूर केले नाही .त्यामुळे आदिवासी गरीब कुटुंबीयांना सदर योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचे मत सरपंच अतिश पवार व्यक्त केले .

यमुनाबाई इरपाते ही घरकुल योजनेसाठी पात्र आहेत .परंतु त्यांना पक्के घर नसल्याने कच्चे कवेलूच्या घरातच वास्तव्य करावे लागत आहे . घरांतील छत पडल्याने भांड्याकुंडयासह जीवनावश्यक वस्तूचे नुकसान व घराची छत कोसळल्याने पक्के घरकुल बांधकामाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे .

या दुर्घटनेची माहिती मिळताच सरपंच अतिश पवार घटनास्थळी पोहचले व तात्काळ दुर्घटनेची माहिती तलाठी प्रियांका अलोने यांना दिली . माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कोतवाल रवी ऊके यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली व नैसर्गिक दुर्घटनेचा अहवाल तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर केला .नैसर्गिक आपत्त्तीतून सदर दुर्घटना घडल्याने ती शासकीय नियमात बसत असल्याने आपदग्रस्ताना मदत करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.