Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०६, २०२०

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रणय रमेशराव गोमाशे यांचा सत्कार



नागपूर/ प्रतिनिधी

Dr.Shrikant Shinde Foundation आणि अजिक्य प्रतिष्ठान आयोजित कल्याण मोहोत्सव २०२० यॆथे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल PRANAYG Musicians & Band Mumbai चे मुख्य गायक प्रणय रमेशराव गोमाशे यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ अभिनेत्री निशीगंधा वाड यावेळी उपस्थित होत्या. प्रणय च्या आजवर संगीतक्षेत्रातील कामाची दखल घेत अभिनेत्री निशीगंधा वाड यांनी कौतुक केले.
गायक प्रणय गोमाशे हे मूळचे आपल्या विदर्भातील चंद्रपूर चे असून स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले, त्या दरम्यान ते नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे पुढे संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली,पुढे मुंबई विद्यापीठ संगीत विभाग माजी विद्यापीठ प्रमुख व जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक पंडित मुरलीमनोहर शुक्ला गुरुजी यांच्या कडे गायकी ची तालीम घेत सुप्रसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर,राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे इ.यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि मुख्य म्हणजे प्रणय ने संगीत विषय घेऊन पदविका पुर्ण केलीय(MA music). विविध राज्य स्तरीय गायन स्पर्धा,जागतिक सांस्कृतिक महोत्सव,विविध राज्यात गायनाचे कार्यक्रम इ.ठिकाणी आपली कला सादर करून नाव कमावून विविध सामाजिक संघटना मार्फत देण्यात येणारे "युवा पुरस्काराने" सन्मानीत आहेत. मुंबई येथील प्रसिध्द PRANAY G MUSICIANS AND BAND चे मुख्य गायक आहेत मुंबई च्या व इतर स्थानिक कलाकारांनी मिळून मराठी, हिंदी, वेस्टर्न, संगीताच्या वेगवेगळ्या तर्हा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जुण्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर,त्यांच्या बॅन्ड ला युनिक बनवते, म्हणूनच कमीत कमीम वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव संगीत संच आहे. साध्यावत मुंबई मधील असे कोणतेच व्यासपीठ नाही जिथे PRANAY G बॅंड ने सादरीकरण केले नसेल,संपूर्ण मुंबईतच नवे तर विदर्भातील अनेक शहरात, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे, देशातील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या पुढे गाण्याची संधी मिळाली ,गोवा सरकार आयोजित "गोवा महोत्सव" मध्ये सुद्धा यांनी प्रसिद्धी मीळवलीय अश्या अनेक मेट्रो शहरात यांची हॉउसफ़ुल्ल कार्यक्रम आजवर झालेली आहेत. त्याव्यतिरिक्त प्रणय गोमाशे हे मुंबईच्या समाजभारती या त्रैमासिक अंकाचे ते सह-संपादक असून मुंबई मध्ये विदर्भातून येणाऱ्या होतकरू लोकांसाठी ४० वर्षापासून समाजसेवेचं कार्य करणाऱ्या "विदर्भ युवक मंडळ कल्याण" चे ते सह कोषाध्यक्ष,अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ शाखा कल्याण चे सहसंघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सादर सत्कार हा विजय हा.सोसायटीचे अध्यक्ष,विदर्भ युवक मंडळ कल्याण चे संस्थापक श्री. पि डी चौधरी ह्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवीका,सदस्य स्थाई समिती, शिक्षण समिती माधुरीताई प्रशांत काळे, अजिक्य प्रतिष्ठान कल्याण चे अध्यक्ष श्री.प्रशांत काळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजवर जतन केलेल्या शस्त्रांचे संग्रहक आणि अभ्यासक श्री.गिरीश लक्ष्मण जाधव यावेळी मंचावर उपस्थित होते.
संपुर्ण चंद्रपुरवासियांसाठी ही गर्वाची बाब असल्याने चंद्रपुरकरांकडून सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.