शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जळणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या,तसेच पेट्रोल पंप धारकांकडून खुल्या बाटलीत पेट्रोल दिला जातो त्यावर पूर्णता बंदी आणा, मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेने जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेनी जिल्हाधिकारी साहेब द्वारे पत्र देऊन मान.मुख्यमंत्री साहेबांना मागणी केलेली आहे की 03/02/2020 सोमवारी सकाळी आपल्या ड्युटी वर जात असलेल्या प्राध्यापिका कुमारी अंकिता हिच्यावर हिंगणघाट येथील नांदोरी चौकात पेट्रोल टाकून त्या नराधमाने जो अतिशय घृणात्मक कृत्य केला आहे ,हा प्रकार अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे,त्या बद्दल आम्ही महिला सेनेकडून तीव्र निषेध दर्शवून,व त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी केली.
व तसेच पेट्रोल पंप धारकांकडून खुल्या बॉटल मध्ये पेट्रोल देणे टाळावे याकळे ही लक्ष देण्यात यावा ही मागणी ही केलेली आहे.प्रतिमा ठाकूर,मायाताई मेश्राम,वाहतूक जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता,शाहरुख अली,शशिकला डांगे,ज्योशना सावरकर,कृष्णा लुथडे, अर्चना हेमने,किरण जुनारकर,चंदा महाजन,कांचन मस्के आदी उपस्थिती होती.