ओ.बी.सी ची जातीनिहाय जनगनणा व्हावी यासाठी खा.धानोरकर यांचे पं.मोदी यांच्याकडे साकडे सिंचन,रोजगार ,पर्यटन,दिक्षाभुमिचा विकासावर केली चर्चा
चंद्रपूर :
चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळु धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चंद्रपुर मतदार संघातील अनेक प्रश्नां संदर्भात चर्चा केली.
संबधीत प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यासमोर यावेळी धानोरकर यांनी मांडले माणि त्यासंबधीच निवेदन पंतप्रधान मोदी यांना यावेळी दिलं.
२०२१ मधे राष्ट्रिय जनगणना होणार आहे, यामधे ओबीसी साठी स्वतंत्र काॅलम असावा, ओबीसी ची स्वतंत्र जनगणणा होत नसल्याने समाजाला योग्य ते लाभ मिळु शकत नाही आहे, अनेक लोकांनी त्या विरुद्ध आंदोलनात्मक पावित्रा घेतलाय. त्यामुळे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र काॅलम जनगनणेत असावा अशी मागणी धानोरकर यांनी पंतप्रधानांना भेटुन केली.
यावेळी धानोरकर यांनी कर्नाटक एम्टा ही खाण २०१५ पासुन बंद आहे, ज्यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे तरी ही खाण पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. पुर्व पंंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी भद्रावती तालुक्यात ३००० एकर जमीन पावर प्लँट साठी मंजुर केली परंतु अजुनही तिथे कोणताही उद्योग सुरु होऊ शकला नाही.
तिथे एखाद्या उद्दोगास मान्यता मिळाल्यास स्थानिकांना रोजगार मिळु शकेल. या क्षेत्रातील अनेक शेतकर्यांच्या जमीनी कोळसा खाणीत गेल्या त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नौकर्या देण्यात याव्या. चंद्रपुर मधे अजुनही अनेक आजारांसाठी इथल्या मजदुरांना उपचारांसाठी नागपुरला जावं लागतं त्यामुळे चंद्रपुरात एक मल्टिस्पेशालीटी रुग्णालयाला परवानगी देणयात यावी अशा अनेक प्रलंबित प्रश्नावर मोदी यांच्याशी चर्चा केली.
चंद्रपुर जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत जसे निम्न पैगंगा,वडनेर, या सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी विनंती बाळु धानोरकर यांनी मोदी यांना केली. आॅर्डीनेस फॅक्टरी मधील २०५ लोकांनी नौकरीसाठी अर्ज दिलेय पण त्या पैकी एकालाही नौकरी मिळु शकलेली नाही यासंबधी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली .
यवतमाळ, वणी हायवे नंबर सात चिखलगाव रेल्वे क्रासींग वर नवीन पुल बनवण्यात यावा, बल्लारशा रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी गाड्या थांबतात त्यामुळे इथल्या सर्व प्लॅटफाॅर्म वर लिफ्ट लावण्यात यावी. या संबधीच भुमीपुजन आधीच्या खासदारांनी केलेले आहे पण अद्याप काहीही काम सुरु झालेल नाही.
मुंबई ते चंद्रपुर आणि पुणे थेट ट्रेन सुरु करण्यात यावी जेणे करुन नागरीकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळता येईल. सर्व रेल्वे रुळाच काम शिघ्र गतीने पुर्ण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. चंद्रपुर औद्योगीक शहर आहे पण येथील प्रस्तावीत विमानतळ राजुरा येथे आहे.
परंतु हे विमानतळ भद्रावती येथे बनवण्यात यावे कारण राजुरा शहर जिल्ह्याच्या दुसर्या टोकाला आहे. भद्रावती शहर मध्यवर्ती असल्याने यवतमाळ, गडचिरोली आणि आजुबाजुच्या गावांना हे विमानतळ जवळ पडेल त्या अनुषंगाने संबधीत विमानतळ भद्रावतीला स्थानांतरीत करण्यात यावे अशी विनंती धानोरकर यांनी यावेळी केली. चंद्रपुरच्या दिक्षाभुमीला ऐतिहासीक वारसा आहे.
अनेक बौद्ध बांधवांची आस्था याठीकाणी जुळलेली आहे त्यामुळे दिक्षाभुमीचा कायापालट करण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन द्यावा या सोबतच चंद्रपुर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रिय उद्यान, गोंडकालीन किल्ले आहेत. जागतीक पर्यटनाच्या दृष्टीने या सर्वांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा अशी मागणी धानोरकर यांनी भेटी दरम्यान केली.