ओसीडब्लू कडून पुन्हा दिशाभूल
नागपूर:
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्लू कडून शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
नागपूर शहरात दिनांक ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी महावितरणकडून पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे देखभाल दुरुस्तीसाठी कामाचे नियोजन करण्यात आल्याने शहरातील सुमारे ८० टक्के जनतेला पाणी पुरवठा होणार नाही. असे ओसीडब्लू कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक ओसीडब्लूच्या देखभाल दुरुस्तीत महावितरणचा काहीही संबंध नाही. सदर देखभाल आणि दुरुस्ती ही ओसीडब्लूकडून पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील “४ पोल स्ट्रक्चर”वर करण्याचे नियोजन याच संस्थेने केले आहे. ही त्यांची अंतर्गत बाब असताना महावितरणचे नाव घेऊन जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ओसीडब्लूकडून केल्या जात आहे.
महानगर पालिकेच्या कार्यकारी अभियंता (जलप्रदाय विभाग) यांनी दिनांक ४ फेब्रुवारी रोजी अंतर्गत पत्र लिहून कामाचे नियोजन करावे अशी सूचना केली होती. यानुसार हे काम ओसीडब्लूची अंतर्गत बाब होती. या कामासाठी वीज पुरवठा बंद राहिल्याने नागपूर शहरातील जनतेची पाण्यासाठी गैरसोय होणार होती. परिणामी जनतेत निर्माण होणाऱ्या रोषाचा सामना आपल्याला करावा लागू नये यासाठी यात महावितरणचे नाव जाणीवपूर्वक टाकण्यात आले. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
या अगोदर देखील ओसीडब्लूकडून महावितरणचे नाव समोर करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यात आहे.