ना.छगन भुजबळ यांचे संकल्पनेतून साकरणार गाव तेथे तलाठी कार्यालय
येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील तसेच ग्रामीण गावातील तलाठी तात्या म्हटल की ग्रामीण भागात अनन्यसाधारण महत्वाचे पद आहे. शासकीयच नाही तर सामाजिक जीवनात सुद्धा अजूनही तलाठी तात्या यांचेकडे आदराणे पाहिले जाते. आपला देश शेतीप्रधान, त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी हा महत्वाचा घटक... त्यामुळे शेती संदर्भातिल तसेच शासकीय योजनेची प्रत्येक नोंद करायची म्हटल की तलाठी तात्या कड़े जाव लागत. पण तालुक्यात कुठेही तलाठी तात्याला हक्काचे कार्यालय नाही हे दुर्दैव.
तालुक्यात ऐकून 28 तलाठी कार्यालय आणि 6 मंडल कार्यालय कार्यरत आहेत. मात्र एकही ठिकाणी हक्काचे शासकीय कार्यालय नाही. पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ येवला दौऱ्यावर असताना येवला पंचायत समिति गटनेते मोहन शेलार यानी ही बाब ना.भुजबळ यांचे निदर्शनास आणून दिली. लवकरच यासाठी निधि मंजूर करुण मतदार संघात गाव तेथे तलाठी कार्यालय साठी सूंदर इमारत बांधन्याचा मनोदय पालकमंत्री ना.छगनरावजी भुजबळ यानी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी ना. भुजबळ यांचे माध्यमातून गाव तेथे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करण्यात आले असून मतदार संघात प्रत्येक गावात सूंदर इमारतित ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित आहे.त्यामुळे लवकरच सर्वत्र नवीन ईमारतित तलाठी कार्यालय दिसणार यात शंका नाही. गाव तेथे तलाठी कार्यालय ही मतदार संघातिल प्रत्येक गावासाठी निश्चितच एक भेट असणार आहे.
"गाव तेथे सुंदर ग्रामपंचायत कार्यालय ही संकल्पना ना. भुजबळ साहेबांनी मतदार संघात साकार केली आहे.गाव तेथे सूंदर तलाठी कार्यालय लवकरच साकरणार यात शंका नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक भेट असेल.
- मोहन शेलार, गटनेते पंचायत समिति येवला.