Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०

हङसर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घसरुन तरुणी ठार






जुन्नर (वार्ताहर ) जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील हडसर किल्ल्यावर शिवजयंती निमित्ताने मुंबईहून आलेल्या ट्रेकर्स ग्रुप मधील एक वीस वर्षीय तरुणी किल्ल्यावर शेवटच्या टप्प्यात ट्रेकिंग करीत असताना अचानक घसरून खाली दगडावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला
सिद्धी सुनील कामठे वय २० रा.चिंचपोकळी मुंबई असे ह्या घटनेतील मृत तरुणीचे नाव आहे.

सह्याद्री फाउंडेशन ठाणे ह्या गड किल्ले भटकंती करणाऱ्या संस्थेचे ३५ सभासद बुधवार दि.१९ रोजी सकाळी शिवजयंती साजरी करण्या करिता हडसर किल्ल्यावर आले होते ह्या किल्ल्यावरील खुंटी च्या वाटेने असलेल्या लोखंडी गजाच्या बाजूने चढाई करण्याकरिता ह्या संस्थेच्या वतीने तिथे दोर खंड बांधण्यात आला होता ह्या दोरखंडा च्या साहाय्याने ४/५ मुली सुखरूप पणे वर आल्या होत्या सिद्धी ही हातात भगवा झेंडा घेऊन व पाठीवर सॅक घेऊन दोरखंडा च्या साहाय्याने किल्ल्यावरील शेवटच्या स्थरावर पोहचत असताना तिच्या एका मैत्रिणीने सिद्धी खाली पडली असा आरडाओरडा केला ह्या वेळी ती एका दगडावर आपटून तिला गंभीर दुखापती होऊन ती बेशुद्ध झाली होती तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने जुन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता ती तपासणी पूर्वीच मयत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले ह्या घटनेची खबर भावेश कुंभारकर याने जुन्नर पोलीसांना दिली पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे ह्या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल लोहकरे करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.