Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०

शिवजयंती निमित्ताने "१०१ शिवबा सलामी"





जुन्नर (वार्ताहर )
शिवजयंती निमित्ताने आज प्राथमिक शाळा तेजूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी "१०१ शिवबा सलामी" ह्या कार्यक्रमाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीगणाचे स्वागत किल्ले शिवनेरी येथे उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमात ५१ मुली व ५० माजी विद्यार्थी यांनी सहभागी झाले होते. आदिवासी डांगीनृत्य व शिवसृष्टी हे कलापथकांच्या सादरीकरणाचा मुख्य भाग होता. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पी एस मेमाणे, खोडदे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाची तयारी करण्यात आलेली होती
या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कौतुक केले.
मुख्याध्यापक आ. का. मांडवे व तळपे तानाजी (संयोजक) तसेच शिक्षक वृंद, नांगरे सचिन, कुडेकर लक्ष्मण व उंडे मोहन यांनी व न्यू भैरवनाथ झांजपथक ठाकरवाडी तेजूर यांनी विशेष सहकार्य करून या १०१ शिवबा सलामी या पथकाची यशस्वी तयारी केलेली असल्याने उपस्थित शिवभक्त यांचा उत्साह देखील सादरीकरणाच्या वेळी दिसून आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.