Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी




निफन्द्रा-येथील प्रवीणभाऊ आडे पवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार तर प्रमुख अतिथी म्हणून दोडके सर बोरकर सर बुरांडे सर बुगावार सर प्रामुख्याने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थी रिया लाकडे, चेतन नवंघडे,पायल वाढणकर, भूषण निसार, रोहन भोयर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुरांडे सर या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तुत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले . कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष भाषण झाले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती साठी काय केले व आदर्श राज्य कसे असे असले पाहिजे हे आपल्या मनोगता तुन व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ममता सूत्रपवार हिने तर आभार सागर गेडाम यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.