८० कोंबड्या चोरणाऱ्या २ आरोपींना
रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चोरटे सोने, चांदी आणि रोकड लुटण्यासाठी घरफोडीच्या घटना शहरात करतात हे नित्याचेच झाले आहे. मात्र यावेळी पोलिसांसमोर वेगळीची तक्रार आली. तीही कोंबडी चोरीची. या तक्रारीने क्षणभर पोलिसही चक्रावून गेले. चोरट्यांनी इंदिरा नगर परिसरातील मुल्लाजी चिकन सेंटरवरुन तब्बल ८० कोंबडया पळवून नेल्या. दुकानदाराला हि बाब माहित होताच नंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
शहरात येथील इंदिरा नगर परिसरात मूल मार्गावर चिकन व्यापारी मुल्लाजी यांचे चिकन सेंटर आहे. साबीर अली जुम्मन अली यांच्या मालकीच्या या सेंटर मधून ते कोंबडी विक्रीचा व्यवसाय करायचे. २७ फेब्रुवारीला त्यांच्या दुकानातून बायलर ३० नग आणि गावठी प्रजातीच्या तब्बल ४० कोंबड्या गायब झाल्याचे दिसले.
कोरोनाच्या अफवेने खराब झालेला पोल्ट्री मार्केटमध्ये आधीच पोल्ट्री बुडत असतांना आता चोरटे कोंबड्या चोरू लागल्याने पोल्ट्री फार्मर व व्यापार्यावर मोठे संकट आले आहे.
अली यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली. त्यांनी तक्रार स्वीकारली. चोरट्यांनी शहरातील कोंबडी विक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आमच्याकडे विक्रीसाठी कोंबड्या आहे, असे सांगत सुटले.
मात्र एवढ्या संख्येतील कोंबडया एकाच वेळी घेण्यास कुणीच तयार नव्हते . एका कोंबडी विक्रेत्यांने त्यांचा क्रमांक घेतला. पैशाची जुळवाजुळव झाली की मी तुम्हाला संपर्क करतो, असे आश्वस्त केले. दरम्यान शहरातील कोंबडी विक्रेत्यांमध्ये कोंबडी चोरी प्रकरणाची चर्चा झाली. तेव्हा मोठ्या संख्येत कोंबडी विकण्यासाठी दोन युवक आल्याची माहिती समोर आली.
त्यातील एकाने त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला होता. तो अली यांच्याकडे दिला. अलींनी दुसऱ्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते युवक इंदिरा नगर येथीलच असल्याचे समोर आले. पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी प्रवीण हंडी आणि बाळा आमले यांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी त्यांचा पद्धतीने विचारपूस केली. तेव्हा दोघांनीही कोंबडया चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून शिल्लक कोंबड्या ताब्यात घेतल्या आणि मुल्लाजी चिकन सेंटरला पोलिसांनी परत दिल्या. सध्या प्रवीण अणि बाळा कोठडीत जामीनाच्या प्रतिक्षेत आहे.
दर्जेदार पोल्ट्री फीड मिळवण्यासाठी संपर्क करा
9175937925