Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १०, २०२०

आशीर्वाद मोशन फिल्म प्रस्तुत "अवसान" चित्रपट उद्घाटन



येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: चित्रपट क्षेत्रात प्रत्येकाने उतरले पाहिजे व आपले कारिअर केले पाहिजे व ग्रामीण भागातून निश्चितच दर्जेदार चित्रपटांची निमिर्ती शक्य आहे या उद्देशाने आशीर्वाद मोशन फिल्म ने नवीन चित्रपट निर्मितीचे ध्येय ठेवलेले आहे चित्रपटाचा उदघाटन सोहळा येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे पार पडला यावेळी उदघाटन नाशिक म्हाडाचे अध्यक्ष नामदार शिवाजी ढवळे यांचा हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पं .स.सभापती प्रवीण गायकवाड ,अंदरसुल बाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे आपलं महानगरचे प्रतिनिधी प्रसाद गुब्बी,दैनिक नवभारत प्रतिनिधी विलास कांबळे ,संपादक साप्ताहिक येवला वृत्त धीरज परदेशी प्रसिद्ध कवी भाऊसाहेब दौंड उपस्थित होते
'मैतर जीवाचा मैतर ,मैतर जीवाचा मैतर' ह्या गण्याची झलक यावेळी डायरेेेक्टर भागवत यांनी प्रस्तुत केली यावेळी टी. व्ही. अभिनेता रोहित सर्वार यांनी नामदार ढवळे यांचा सत्कार केला कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणावरून टी. व्ही कलाकार उपस्थित होते.यावेळी नामदार ढवळे यांनी सांगितले की लोकांना वाचायला वेळ नाही, तर थोडासा बघायला वेळ आहे त्यांच्यासाठी जर कोणी जीवनपट करत असेल त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे फिल्म इंडस्ट्री कोणाची जहागीर नाही आज सर्वसाधारण माणूस सुद्धा या इंडस्ट्री मध्ये आज यशस्वी आहे चित्रपट महामंडळे जरी एकाद्या युवा कलाकाराला मदत करत नसेल तरी मी कायमस्वरूपी त्यांचा बरोबर आहे व राहील असेही त्यांनी स्पस्ट केले निर्माता संदीप भवर यांनी आभार प्रदर्शन केले
कोट-

जीवनात प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे व तो केला तरच आपण कोणत्यााही क्षेत्रात यशस्वी होऊ असे मला वाटते व आमचा चित्रपट निश्चितच लोकाना आवडेल
- शशिकांत भागवत
डायरेक्टर, आशीर्वाद मोशन फिल्म

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.