यवतमाळ:
काँग्रेस हा पक्ष नसुन विचार आहे त्याची बांधीलकी भारतीय संविधानाशी असल्याने, हा विचार रुजला पाहीजे. त्यामुळे काँग्रेस पक्ष अधिकाधीक वाढवण्यासाठी पक्ष संघटना आपण सगळ्यांनी मजबुत केली पाहीजे असे आव्हान खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते यवतमाळ येथिल नवनियुक्त मंत्री तथा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
देशातील मुलभुत प्रश्नांना बगल देत भेदभावाचे राजकारण केल्या जात आहे. सविधान विरोधी निर्णय घेतले जात असल्याने देशात भितीचे वातावरण पसरले आहे. देशाचा विकास हेच कॉग्रेस पक्षाचे ध्येय आहे. काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहीजे असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हणाले.
मेळाव्यात नवनिर्वाचित मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर राज्यसभा विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद, अशोक चौहान, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, आ.अतुल झनक, विजय दर्डा, आ, सुलभाताई खोडके, माणिकराव ठाकरे, चारुळता टोकस, शिवाजीराव मोघे उपस्थित होते.मेळाव्याला हजारोचा संख्येने काँग्रेस कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.