आगीत खत निर्मितीच्या मशीन जळून खाक
घटनास्थळी दोन अग्निशामक बंब दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
प्रमोद पाणबुडे:
वर्धा नागरपालिकेच्या डंपिंग यार्डला पहाटे दरम्यान आग लागलीय.यात या यार्ड असणाऱ्या घनकचरा व्ययस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक झाल्या.आग लागल्याची माहिती मिळताच इंझापूर येथील सरपंचाने नगरपालिकेला माहिती दिली.ही आग पहाटे चार वाजता लागलीय.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्धेच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.
सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली असून ती धुमसत आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून घटनास्थळी पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहे.या आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या बेलिंग मशीन,सेक्रेनिंग मशीन आणि दोन ग्रेडर मशीन जळून खाक झाल्या आहे.तर ओला आणि सुका कचऱ्याचे सेट सुद्धा जळाले आहे.