Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १५, २०२०

दीक्षाभूमीला निधी कमी पडू देणार नाही:खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 डॉ. बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांचं चंद्रपूरशी घनिष्ठ नातं होतं. त्यांनी नागपूरनंतर चंद्रपूर येथे दीक्षा दिली होती. चंद्रपुरात येथील दीक्षाभूमीच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. 

दीक्षाभूमि चंद्रपूरसाठी सोलर पैनलचे यूनिट बसवीन्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव कुणाल घोटकर, महानगरपालिका नगरसेवक राहुल घोटेकर, सहसचिव अनुज घोटेकर, शुभम चिमुरकर, स्वप्निल कांबळे यांनी निवेदनातून निधीची मागणी केली. हि मागणी लवकरच पूर्ण करून दीक्षाभूमीच्या विकासाकरिता भरीव निधी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.