आंदोलक व पोलीस यांच्यात धक्काबुक्की
खासदार,आमदाराचे पुतळे बनवून मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
वर्धा/प्रमोद पाणबुडे:
तुळजापूर, दहेगाव गोसावी असे २१ गावचे अति गंभीर प्रश्न सुटत नसल्यामुळे वर्ध्याच्या तुळजापुर रेल्वे स्टेशन, (दहेगांव गोसावी) 21 गांवचे ग्रामस्थ आंदोलना करण्यात आले असुन हे आंदोलन गावातील रेल्वे स्टेशन जवळ ठिया माडून केले आहे.
जबलपूर,इंटरसिटी एक्सप्रेसला तुळजापूर थांबा द्यावा,२१ गावांतील नागरिकांना ये-जा करण्याकरिता पूल बनवावा.मोठ्या गाड्यांच्या ये-जा करिता ओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात यावे.गावातील नागरिकांचे रेल्वे गाडीच्या खालून जात असताना आतापर्यंत 100 लोकांचे बळी गेले आहे.अशा मागण्या घेऊन ग्रामस्थ बसले आहेत.तर लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त करीत त्यांच्या पुतड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोकप्रतिनिधींकडून निव्वळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले.