नागपूर/प्रतिनिधी:
नागपूरचा कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर याचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केला.
शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हि धडक कारवाई सुरु केली.या कारवाई नंतर अनेकांचे धाबे दणाणले.
तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.याचाच एक कारवाई सपाटा शहरातील अनधिकृत कामाकडे मुंडे यांनी केला.
इतवारी परिसरात हा अनाधिकृत बंगला होता.नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले.
video help:Z24 tass
गॅंगस्टर संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी अनाधिकृत बंगला होता. याबाबत नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनपाच्या पथकाने आज धडक कारवाई करत हा बंगला पाडला.