जुन्नर /आनंद कांबळे
दप्तर मुक्त शाळा उपक्रमांतर्गत शाळेत आठवडे बाजार हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बूचकेवाडी येथे घेण्यात आला.
आठवडे बाजार साठी मोठ्या संख्येने पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.आठवडे बाजाराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते झाले. . व्यवहार कुशल होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत आशाताई बुचके यांनी व्यक्त केले. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.शिक्षकांचे अभिनंदन केले.मुलांकडून भाजीपाला खरेदी केला.खाउगल्ली तील चहाचा आस्वाद घेतला.आठवडे बाजाराला दगडूशेठ पवार,सरपंच,उपसरपंच,यांनी भेट दिली.
महिला पालकांनी उस्फूर्त सहभाग दर्शविला.आठवडे बाजार साठी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बाबू शेठ डेरे,सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी गणेश शेठ पवार यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याद्यापिका उज्वला नांगरे व शाळेतील शिक्षक जाधव सर,सासवडकर मॅडम यांनी केले.आठवडे बाजाराला गवार वाडी चे शिक्षक ,अंगणवाडी सेविका ,विद्यार्थी,बुचकेवडी च्या अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,विद्यार्थी उपस्थित होते.