नागपूर दि 29 जानेवारी 2020
बहुजन हिताय संघाच्या वार्षिक कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लष्करीबाग येथील आंबेडकर मिशन सभागृहात राष्ट्रीय विधी विद्यापीठ,नागपूर येथील वसतीगृह अधीक्षिका श्रीमती नेहा ठोंबरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी बहुजन हिताय संघाचे अध्यक्ष डॉ. शंकर खोब्रागडे उपस्थित होते.
भारतातील स्त्री-शिक्षणाचा पाया रचणा-या क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासाचे या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून नेहा ठोंबरे यांनी विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले.
आतापर्यंत नागपूर व इतर जिल्ह्यात विविध समाजसेवी संघटनेच्या वतीने आयोजित 25 कार्यक्रमांमध्ये या प्रयोगाचे सादरीकरण झाले आहे.