Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ३०, २०२०

भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : खासदार बाळू धानोरकर वरोरा, भद्रावती तालुक्यील चार ठिकाणी बंधाऱ्यांचे भुमीपुजन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व उद्योग व्यवसाय आहे. परंतु मुबलक पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना व उद्योंगाना मोठी समस्या भेडसावत असते. परंतु भविष्यात पाणीप्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ते वरोरा, भद्रावती बोर्डा, खातोडा, नंदुरी, बेलोरा या चार गेटेड स्ट्रोरेज वियर बंधाऱ्यांचे भुमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
वरोरा, भद्रावती या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करण्यात येते. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अनेक दशकापासून या भागातील शेतकऱ्यांची बंधारा बांधकामाची मागणी होती. या मागणीची दखल घेत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जलसंधारण विभागाला बंधारा बाधकामाचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी चंदा ते बांधा योजनेतून काम मंजुर केले. या बंधाऱ्यांमुळे जवळपास ४०० टी.सी. एम. पाणीसाठा शेतकऱ्यांना सिचनासाठी उपलब्ध होणार आहे. सदर पाणीसाठ्यामुळे ६५० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. या बंधाèयांमुळे येथील शेतकèयांनी समाधान व्यक्त केले आहे. या सोहळ्याला पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू चिकटे, बोर्डा सरपंच माधुरी बल्की, उपसरपंच धनराज आसुटकर, सालोरी सरपंच जीवन बावने, बंसत सिंग, ङ्किरोज शेख, उके, विजय काळे, प्रतिभा पाचभाई, तुलसीदास गेडाम, प्रिया भोयर, सरपंच माधुरी बल्की, तुलसी आमले, देविदास अधिकारी, अमीत लाहोटी यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.