बिनविरोध सभापतीपदी विशाल तांबे तर उपसभापतीपदी रमेश खुडे
जुन्नर (वार्ताहर )
जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आमदार अतुल बेनके यांची पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादी पक्षाकडे आणण्यात यश मिळविले.
पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे.पंचायत समिती आणि त्यामधील सदस्य यांचे फार मोठे योगदान यानिमित्ताने यापुढील काळात असणार आहे.अधिकारी वर्गासोबत चांगला समन्वय ठेवुन विकासाची कामे आणि योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहचतील याचा प्रयत्न आपण सर्वांनी करुया असे आमदार अतुल बेनके यांनी विश्वास व्यक्त केला.
तालुक्याचा आमदार म्हणुन ज्या ज्या वेळी काही अडचण येईल त्या त्या वेळी मी आपणास सहकार्य करण्यास तत्पर असेल पण यापुढे कोणत्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय पंचायत समिती चालवायचा आमचा मानस आहे असेही आमदार बेनके यांनी सांगितले .
राज्यात जशी महाविकास आघाडी आहे तसेच तालुक्यात वरीष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही सोबत राहुन लोकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शिवसेना पक्षाचे नेते,कार्यकर्ते,ज्यांनी ह्या प्रक्रियेमधे सहकार्य केले त्यासर्वांचे आभारआमदार अतुल बेनके व्यक्त केले.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या सहकार्यातुन आमदार अतुल बेनके ह्यांच्या आदेशानुसार सभापती म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे विशालजी तांबे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ह्यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उपसभापती म्हणुन रमेश खुडे याचं नाव जाहीर केले.
निवडणूक प्रक्रियेमध्ये सभापती संजय काळे आणि चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सहकार्य केले.
इच्छुक बाकी उमेदवारांनी नाराज न होता त्यांना देखील पक्षनिष्ठेचा विचार करून पक्षामध्ये सन्मान आणि यापुढील काळात त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल.
यावेळी पंचायत समितीमध्ये भाऊ देवाडे ,अनघा घोडके ,तालुका प्रमुख माऊली खंडागळे , राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार ,शरद लेंडे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
! यापूर्वी पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात होती.आता महाविकास आघाडीकडे आली आहे. सेना ,राष्ट्रवादी , काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र दिसले.
पंचायत समिती यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या ताब्यात होती. त्यांना सेनेतून काढून टाकले होते .तसेच अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. पंचायत समितीच्या सेनेच्या सदस्यांनी बुचके यांचे काम केले होते. ते समर्थक यावेळी या निवडणूकीपासून अलिप्त राहिले.