जुन्नर /आनंद कांबळे
शिक्षक सेवक समितीचे काम शैक्षणिक व शालेय व्यवस्थापनेकरिता चांगले असून ,समितीच्यावतीने नवीन प्रकाशित केलेली दिनदर्शिका सर्वाना मार्गदर्शक ठरेल असे मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती पुणे जिल्हा यांच्यावतीने नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन आयुक्त विशाल सोळंखी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष संतोष शिळमकर,संतोष तनपुरे,विजय राठोड, शिवाजीराव माने, लक्ष्मण दुधाट, पुणे शहर अध्यक्ष विश्वास कोचळे ,श्रीकांत रहाणे, संभाजी थोरात, धिरज गायकवाड ,नगरसेविका प्रियांका बारसे तसेच शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
आयुक्त विशाल सोळंखी पुढे म्हणाले की, या दिनदर्शिकेमधून शालेय व्यवस्थापन नियोजन तसेच वर्षभर राबविण्याचे उपक्रम याबाबत यामध्ये मार्गदर्शन केले आहे .त्याचप्रमाणे शासननिर्णय सुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. संघटना फक्त शिक्षक प्रश्नाबाबत आग्रही नसून शालेय कामकाजासाठी प्रयत्न करते हे या उपक्रमातून दिसून येते. प्रास्तविक कार्याध्यक्ष संतोष शिळमकर यांनी केले तर आभार शहराध्यक्ष विश्वास कोचळे यांनी मानले.