Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०४, २०२०

सावित्रीच्या लेकींनो, आई वडिलांचा मान-सन्मान वाढवा – डॉ.वैशाली गायकवाड




जुन्नर /आनंद कांबळे 

   तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात , शारीरिक –मानसिक आरोग्य सांभाळा ,संयम बाळगा ,नवनिर्मितीचे वरदान तुम्हाला निसर्गाने दिले आहे .दोन कुटुंबांची जबाबदारी तुमच्यावर आहे .खूप शिका आणि आई-वडिलांचा विश्वास,मान-सन्मान वाढवा.’ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी’ असे गौरवोद्गार  क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त गोद्रे येथे डॉ.वैशाली गायकवाड यांनी व्यक्त केले.
       गोद्रे (ता. जुन्नर )येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोद्रेच्या वतीने डिसेंट फाउंडेशनच्या ‘ कळी उमलताना ‘ या उपक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त किशोरवयीन मुली समस्या व जनजागृती अभियानात मुलींना मार्गदर्शन करताना डॉ.गायकवाड बोलत होत्या.
    या प्रसंगी मार्गदर्शन करताना डिसेंटचे प्रकल्प समन्वयक एफ.बी.आतार म्हणाले कि आई-वडील हेच आपले दैवत असून,खरे मित्र आहेत.जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येबद्दल आई-बाबांबरोबर बोला मनात भीती बाळगू नका , जीवन अनमोल आहे स्वतःवर काही बंधने घाला जीवन यशस्वी होईल.या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाईंच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  या कार्यक्रमात डॉ. श्रद्धा भिडे , डिसेंटचे संस्थापक जितेंद्र बिडवई , महाराष्ट्र माझा वृत्तवाहिनीचे संपादक अमोल गायकवाड , अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर चे माजी मुख्यध्यापक रोहिदास भागवत ,मुख्याध्यापक अकबर मणियार , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका भाग्यश्री डेरे ,माधुरी बाणखेले ,अंकुश गवारी आदी मान्यवर उपस्थित होते .
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकबर मणियार यांनी , सूत्रसंचालन उपशिक्षिका साधना जुन्नरकर तर आभार संतोष ढोबळे यांनी व्यक्त केले .





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.