Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २०, २०२०

पुन्हा थंडीचा लाट, पावसाची शक्यता



येत्या 26 ते 28 जानेवारीदरम्यान राज्यात पुन्हा थंडीचा लाट येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे.

 विदर्भात मंगळवारी (21 जानेवारी) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 

 दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे हवामान कोरडे राहील. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी आकाश निरभ्र राहील. 



 आज मुंबईमध्ये 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर नवी मुंबईमधील उपनगरांमध्ये 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानामुळे नाशिककर गारठले आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. 

 पुण्यात रविवारी पुणे शहरात 12.7, जळगाव 12.7, सातारा 14.3, उस्मानाबाद 13.4 तर औरंगाबाद शहरामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हवेचा दर्जा खालावला

दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्ये  कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानातही वाढ झाली आहे. रविवारी मुंबई शहरात तसेच उपनगरात कडाक्याची थंडी जाणवली. मुंबई शहरातील बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील  आहे. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.