Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २०, २०२०

सायकलचा वापर शारीरीक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम:आ.किशोर जोरगेवार



पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ
भारत सरकारच्या वतीने सक्षम सायकल रॅलीचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:

व्यस्त जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सायकलचा वापर करणे शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम ठरतो अश्यात दुचाकी किंवा चारचाकीचा अतिवापर टाळून शक्य वेळी सायकलचा वापर करून शरिर सुदृढ ठेवल्या जाऊ शकते त्यामूळे जून तेच सोनं समजत सायकलचा वापर वाढवा असे आवाहण आमदर किशोर जोरगेवार यांनी केले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ,भारत सरकारच्या वतीने सक्षम सायकल रॅलीचे आयोजन व इंधन बचतबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवाशिष चक्रवती, महापौर राखी कंचर्लावार, शेंडे सर, उराडे सर, डॉ. पोद्दार, मनू कुमार आदिंची मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार जोरगेवार यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायकल रॅलीला सुरुवात झाली. 

यावेळी पूढे बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले कि, वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर भयावह् परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते.चंद्रपूर जिल्हा वन संपत्तीने घेरला असला तरी प्रदूषनाच्या बाबतीत जगात प्रसिध्द आहे. यात कोळस्यावर विज निर्मीती करणा-या विज केंद्राचा चंद्रपूरच्या वाढत्या प्रदुषनात मोठा वाटा आहे. यातच चंद्रपूरात वाढत्या वाहनांच्या संख्येमूळे प्रदूषनात भर पडत आहे. वाढत्या वाहनांमूळे प्रदूषनासह मर्यादित इंधन साठ्यावर ही संकट निर्माण होत आहे. आजची परिस्थिती बधता मानवी जिवन भौतीक सूखाकडे वळला आहे. मात्र यात पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत स्वत:सह भावीपिढीचे नूकसान करत आहे. जिवनमान जलत होण्यासाठी वाहनांची गरज असली तरी आता काळाची गरज लक्षात घेता याचा वापर मर्यादित केला गेला पाहिजे. 

सायकलचा वापर करणे प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठी ही उत्तम व्यायाम ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकल चालविण्याचा निर्धार करावा. सायकलिंग बद्दलचे प्रेम वाढण्यासाठी आता शाळा महाविद्यालयांमध्ये ही जनजागृती कार्यक्रम केल्या गेले पाहिजे. कमी अंतराच्या ठिकाणी विशेषाह युवकांनी वाहनाऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. असे आवाहण ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 यावेळी आमदार जोरगेवार यांनी पूढच्या वर्षी आयोजकांच्या वतीने युवकांना 300 सायकल वाटप करण्यात यावी अशी विनंती केली यावर आयोजकांनी ही पूढल्या वर्षी पासून विद्यार्थ्यांना 300 सायकल वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी इंधन बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्याच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.