स्थानिक आझाद बाग मधे ऊंच झाडावर कावळे नायलॉन मांजा मधे अडकले असल्याची माहिती गुड्डू रायपुरे यांनी इको-प्रो संस्थेस दीली, माहिती मिळताच इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग चे सदस्य आझाद बागेत पोहचले. ऊंच झाडावर 2 कावळे अडकले असल्याने पालिका आपत्ती व्यवस्थापनशी संपर्क करण्यात आले. यांची वाहन आणि सीडी च्या मदतीने दोन्ही टीमने आधी एक कावळा रेस्क्यू करण्यात आला. दुसऱ्या कावळा चे रेस्क्यू करिता इको-प्रो चे वैभव मडावी या सदस्यांने संस्थेच्या एडवेंचर साहित्य हार्नेस आणि दोरिच्या साहय्याने झाडाच्या फ़ादीवर ऊंच जाऊन त्यास काढले.
एक कावळा पंखातील नायलॉन मांजा काढल्याने सुटका होताच उडाला, मात्र दूसरा दोन दिवस पासून अड़कुन असल्याने त्यास उपचार करिता ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधे ठेवण्यात आले आहे.
आज सदर रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान इको-प्रो चे बंडु धोतरे, अब्दुल जावेद, अमोल उत्तलवार, सुमित कोहले, वैभव मडावी महानरपालिका आपत्ति व्यवस्थापन चे अंकुश धोपटे, फायर ऑफिसर, पलाश बनकर, वैभव जिझिलवार, सुदीप डे, नीरज बनकर, वीरू नरुले आदि सहभागी झाले होते.