राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन संपन्न
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन
चंद्रपुर (प्रतिनिधी) :
1931 पासून म्हनजे ईंग्रजी राजवटीपासुन ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही. स्वतंत्र भारतात आजतागायत ओबीसी समाज या देशात नेमका किती आहे, ही माहिती नाही. त्यामुळे बहूसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला देशात म्हणावे तसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. तसेच लोकसंख्येनुसार निधी प्राप्त होत नाही, म्हणून 2021 मधे राष्ट्रीय जनगणना होणार आहे. त्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, असे डॉ. अशोक जिवतोडे यांनी धरणे आंदोलनात सांगितले व यासाठी आंदोलनात्मक भुमीका घेणार असल्याचा ईशारा दीला आहे.
आज सोमवार (दि.२०) ला ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने राष्ट्रिय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 2021 मधील राष्ट्रीय जनगणेनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. सोबतच जनगणनेच्या नोंदणी अर्जावर ओबीसी चा जातनिहाय कॉलम तयार करण्यात यावा, यासाठी देशभर धरणे आंदोलन झाले. सदर आंदोलन हे त्यातीलच एक भाग होता. दरम्यान जिल्हाधिकारींना सदर विषयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी बांधव शेकडोच्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासमन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, सचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात सदर धरणे आंदोलन घेण्यात आले.
यावेळी धरणे आंदोलनाला बबनराव फंड, बबनराव वानखेडे, दिनेश चोखारे, प्रा. अशोक पोफळे, अरुण तिखे, रामदास कामडी, प्रा. बबन राजुरकर, शाम लेडे, रमेश ताजणे, ओमदास तुराणकर, प्रा. नितीन कुकडे, प्रा. विजय मालेकर, प्रा. रविकांत वरारकर, भोगेकर सर, कालिदास येरगुडे,गिलोलकर सर, गणपती मोरे, तुळशीदास भुरसे, प्रभाकर पारखी, ज्ञानेश्वर महाजन, दिनेश कष्टी, गणेश आवारी, लांडगे ताई, प्रा. जोत्स्ना राजुरकर, प्रा. मंजूळा निमकर, प्रा. मीनाक्षी पावडे, आदी अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.
अन्यथा बजेट सेशन दरम्यान दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा ईशाराही या धरणे आंदोलनातून देण्यात आला.