येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील गारखेड़ा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील चिमुकल्यांनी तंबाखू मुक्त शाळा म्हणून 11 निकष पूर्ण केलेले असून शाळातील विद्यार्थी व शिक्षक यांनी तंबाखू मुक्त शाळा शाळा घोषित करण्याची शपथ घेतली व तसेच शालेय परिसरात कोणीही तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करू नये याकरिता शासन अधिनियम 2003 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे फलक शालेय परिसात लावलेले आहे तसेच ग्रामस्थांना तंबाखू मुक्तीचा संदेश दिला
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सलाम बॉम्बे फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत जि प शाळा गारखेड़ा शाळेत तंबाखू मुक्त शाळा करण्याचा निर्धार शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी केला.
सुरवातीला विद्यार्थ्यांनी गावांमध्ये प्रभात फेरी काढून तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्ती ची शपथ शाळेमध्ये घेतली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक संदीप वारुळे यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठीचे 11 निकषांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या 250 यार्ड परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आपल्या पालकांना सुद्धा तंबाखूसेवन न करण्याबद्दल आग्रह करीत आहे यातून शालेय जीवनातच विद्यार्थी मनावर चांगले संस्कार घडत असल्याने या उपक्रमांबाबत पालक व शाळा व्यवस्थापन समिती कडून शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले गेले.
यावेळी शाळेमध्ये तंबाखू खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम आरोग्य व मुख याविषयी तपासणी करुन डॉ व नवयुक्क्त सरपंच संजय खैरनार यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष खैरनार ,उपाध्यक्ष समाधान मगर, शिक्षिका माला राठोड़ , संतोष गायकवाड़, नानासाहेब आहेर ,सदस्य संदीप खैरनार ,संजय खैरनार ,आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले.