गारखेडे : येथील सरपंचपदी संजय खैरनार यांच्या निवडीनंतर जल्लोष करताना ग्रामस्थ व पदाधिकारी
येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: गारखेडा येथील थेट सरपंच पदाची निवडणूकित अधिकच रंगत निर्माण झाली होती.मात्र नाते गोते व राजकीय वर्चस्वामुळे संजय खैरनार यांनी विजय खचून आणला.
जेष्अठ नेते अप्पासाहेब खैरनार यांनी पुतण्या सरपंचपदी निवडल्याने आपले वर्चस्व राखले आहे.येथील सरपंच पदासाठी संजय खैरनार (२४०),गणेश खैरनार (२२९),गजानन खैरनार (१८५),दगु खैरनार (४३) यांनी निवडणूक लढ़वली होती.यातून संजय खैरनार हे ११ मते जास्त घेऊन विजयी झाले आहेत.सर्वसाधारण पदासाठी सरपंच पद राखीव असल्याने येथे जोरदार चुरस होती.येथील सरपंचाच्या एक तर सदस्यांच्या सात जागेसाठी चुरशीची लढत रंगली होती गेले.दोन आठवडे गावचे वातावरणही चांगलेच तापले होते.चुरशीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्याने निकालाविषयी उत्सुकता होती.आज तहसील कार्यालयात मतमोजणी नंतर पुढील पाच वर्षासाठी ग्रामस्थांनी संजय खैरनार यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकली आहे.तर सदस्याच्या तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या.प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला जागेवर मिराबाई खैरनार तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर भीमा शंकर खैरनार हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागेवर इंदुबाई खैरनार तर सर्वसाधारण जागेवर कचरू खैरनार हे विजयी झाले. प्रभाग तीनमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला जागेवर मोनाली गायकवाड तर अनुसूचित जातीच्या जागेवर महेश गायकवाड तर सर्वसाधारण महिलेच्या जागेवर अलका खैरनार यांनी विजय संपादन केला.यातून सदस्य पदासाठी यापूर्वीच बिनविरोध म्हणून मोनिका गायकवाड ,मिराबाई खैरनार ,इंदुबाई खैरनार निवडून आल्या होत्या.निकालानंतर राहुसाहेब खैरनार,भिवराज खैरनार,अरविंद खैरनार,विजय खैरनार,बाळनाथ खैरनार, संतोष गायकवाड़,ललित खैरनार,संतोष खैरनार,प्रविण खैरनार,शंकर खैरनार,अप्पासाहेब खैरनार,राधु खैरनार,ज्ञानेश्वर खैरनार,कचरू वर्पे,लहानु खैरनार आदींनी जल्लोष केला.
"शासनाच्या विविध योजना गावात आणून त्या यशस्वीरीत्या राबविण्यासाठी मला ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित असून सर्वांच्या सहकार्याने मी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहील."
संजय खैरनार,नवयुक्त सरपंच,गारखेड़ा.