- भोई समाजाचा विदर्भस्तरीय उपवर युवक युवती परिचय मेळावा
- मच्छीमार समाज प्रबोधन कार्यक्रम
चंद्रपूर – कष्ट करुन मिळणारा आनंद जगात सर्वात सुखदाई आहे. भोई हा समाजही कष्टक-यांचा समाज असून पाण्याची भिती न बाळगता मासेमारीच्या माध्यमातून परिवाराचे पालन पोषण करणारा हा धाळसी समाज आहे. मासेमारीचे कौशल्य असलेल्या या समाजाने आता नवतंत्रज्ञाचा वापर करून मासेमारी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार देणारा समाज म्हणून समोर येत रोजगार निर्मीती करावी असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. आज रविवारी चंद्रपूर जिल्हा भोई संघाच्या वतीने विदर्भस्तरीय उपवर युवक युवती परिचय मेळावा व मच्छीमार समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवृत्त न्यायाधीश तथा मार्गदर्शक चंद्रलाल मेश्राम, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, अध्यक्ष चंद्रपुर जि. भोई स. से. सं. कृष्णाजी नागपुरे, मनपा सभापती तथा चंद्रपूर शहर शिवसेना प्रमुख सुरेश पचारे, दिनानाथ वाघमारे, यशवंतराव दिघोरे, मनोहर पचारे, पांडुरंग गेडाम, पुंडलिक बावणकुळे, बंडू हजारे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले कि, भोई समाजाने नेहमीच समाजीक बांधीलकी जपली आहे. समाजाच्या संस्कृती आणि संस्कार समाजातील प्रत्येक घटकाने आत्मसाद केले पाहिजे. अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनातून समाजाची संस्कृती नव्या पिढीपूडे दर्शविली गेली पाहिजे. छोटया छोटया आयोजनातून होणा-या प्रबोधनाने समाज घडत असतो पूडे या समाजातून राष्ट्र व देश घडतो. त्यामूळे, प्रत्येक विकसीत गोष्टीकरिता समाजाची भूमीका मोठी असते. परंतू सध्या घडीला अनेक छोटे समाज विकासाच्या मूख्य प्रहावापासून दुर फेकावल्या जात आहे. भोई समाजातील विदयार्थ्यांमध्ये पूढे जाण्याची जिद्द आहे. शिक्षणाची तळमळ आहे. मात्र, त्यांना यात योग्य मागर्दशनाची गरज आहे. मासेमारी हा या समाजाचा मूख्य व्यवसाय असला तरी त्यात आता काळा नूसार बदलाव करुन नवतंत्रज्ञानाने हा व्यवसाय समाज बांधवांनी विस्तारित करण्याची गरजही यावेळी आमदार जोरगेवार यांनी बोलून दाखवली. समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. येत्या काळात ते सोडवीण्याच्या दिशेने लोकप्रतिनीधी म्हणून माझी भूमीका असणार आहे. मासेमारीसाठी आता इरई धरनावरच अवलंबून न राहता ईतर पर्याय शोधने गरजेचे आहे. जिल्हातील ११ तलाव मासेमारी करिता आरक्षीत करण्यात यावे अशी आपली भूमीका आहे. तसा प्रस्तावही आपण संबधित विभागाला पाठवीणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगीतले. भोई समाजाच्या वसतीगृहाचे काम पूर्ण करण्याचेही आश्वासन यावेळी आमदार जोरगेवार यांनी समाज बांधवांना दिले. भोई समाज कष्टक-यांचा समाज आहे. जगात कष्टालाच मोल आहे. मात्र आजघडीला कष्टकरी समाज मागे पडतांना दिसत आहे. मात्र आता भोई समाजबांधवांनी कष्टला नव तंत्रज्ञाणाची जोड देत व्यवसाय विस्तारित करण्याच्या दिशेने पर्यंत करावे यात शक्य ती मदत करण्याचे आश्वासन आ. जोरगेवार यांनी दिले. समाजाला अभिप्रेत असा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.