Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १५, २०१९

ज्ञान वर्धिनीची गीता जयंती



नागपूर/ प्रतिनिधी 
ज्ञान वर्धीनी गीता प्रबोधन प्रकल्प नागपूर या संस्थेला यंदा एकतीस वर्षे पूर्ण झाली आहेत. गीतेचा अभ्यास मुलांनी करावा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा या दृष्टिकोनातून या संस्थेचे कार्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीता असायला हवी त्यामुळे जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याचं मार्गदर्शन निश्चित मिळेल.
गीतेची शिकवण जागृत ठेवण्याच्या उद्देशाने ज्ञान वर्धीनी या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आहे.या अनुषंगाने" गीता प्रबोधन प्रकल्प" तसेच प्रशांत मनोहर पार्डीकर  स्मृती खुली गीता निबंध स्पर्धा आयोजित केली जाते.या स्पर्धेत तीन मराठी आणि एक हिंदी निबंधास पुरस्कार देण्यात येतो.यंदा प्रथम अश्विनी कुलकर्णी द्वितीय संगीता वाईकर तर तृतीय स्वाती खानापूरकर तसेच हिंदी प्रथम क्रमांक मालती कश्यप यांना प्राप्त झाला.
   त्याच प्रमाणे सांस्कृतिक स्पर्धा, शालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा, गीता प्रबोधन शिबिर,गीता साधना स्मरणिका प्रकाशन,गीता सेवा पुरस्कार देण्यात येतो यंदा हा पुरस्कार सुमेधा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.
   पंडित बच्छराज व्यास  शाळा हनुमान नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.गीता जयंती या कार्यक्रमास मा. मुधोजी राजे भोसले,तसेच पं. बच्छराज शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जोशी, ज्ञान वर्धीनी चे अध्यक्ष डॉ सुधीर बोधनकर आणि सचिव डॉ माधव पात्री कर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी यावेळी गीतेतील भक्तीयोग याचे सामूहिक पठण केले. 
    सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्णाने कुरुक्षेत्रावर मित्र आणि भगवंत अर्जुनाला जो उपदेश केला तो आजही जीवनात मार्गदर्शन करणारा आहे. गीता   हा एक धर्म ग्रंथ आहे आणि त्याचे वाचन, मनन, चिंतन हे जीवनाला सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे .या दृष्टीने अ ज्ञान वर्धीनी या संस्थेने उचलले हे पाऊल अभिनंदनीय आहे . ज्ञान वर्धीनी ला अनेक हार्दिक शुभेच्छा !!! 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.