Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०२, २०१९

तिकिट वाटपात वडेट्टीवारकङून आर्थिक गैरव्यवहार

काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी केला आरोप

चंद्रपूर/प्रतिनिधी

चंद्रपुरात काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठे नाट्य रंगले होते. परस्पर अपक्ष उमेदवारला ' एबी ' फॉर्म देण्यात आला. यात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वङेट्टीवार यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे , अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली.




काँग्रेसने महेश मेंढे यांना अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केली . मात्र , उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपूर्वी अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना एबीफार्म देण्यात आला . मेंढे आणि जोरगेवार दोघांनीही काँग्रेसचे एबीफार्म जोडले होते . अपक्ष म्हणून जोरगेवार प्रचंड मताधिक्याने विजय झाले . मेंढे चवथ्या स्थानावर फेकले गेले . आता जोरगेवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला . त्यामुळे त्यांच्या पाठीमागे निवडणूक काढत उभे राहणाऱ्या काँग्रेस नेत्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे . या पार्श्वभूमीवर मेंढेनी आरोप केले आहेत . विधानसभेच्या निकालानंतर वडेट्टीवार यांनी पक्षनेतृत्वावर तिकीट वाटपावरून टीका केली होती . याच टीकेचा आधार घेत मेंढेंनी वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले . 


चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मेंढे यांना तीन ऑक्टोबरला 2019 दिली . त्यात विदर्भातील कुठल्याही नेत्याचा सहभाग नव्हता . चार ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता विजय वडेट्टीवार यांच्याकडून प्रकाश देवतळे मला ' एबी ' फॉर्म देतील असे सांगण्यात आले . मात्र मला ' एबी ' फॉर्म न देता अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना देण्यात आला. त्यासाठी काँग्रेस कमेटीची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती . परस्पर अपक्ष उमेदवारला ' एबी ' फॉर्म देण्यात आला . यात मोठा आर्थिक व्यवहार झाला . या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे , अशी मागणी मेंढे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.